19.7 C
New York

Bigg Boss OTT 3: नीरज गोयतनंतर आणखी एक स्पर्धक होणार घराच्या बाहेर

Published:

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’ने (Bigg Boss OTT 3) दमदार सुरुवात केली आहे. या शोला ओटीटीवर चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. आता अनिल कपूर (Anil Kapoor) हा शो होस्ट करणार आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये सुद्धा गेल्या वेळेसारख्या यूट्यूबर्स, पत्रकार, रॅपर्स, आणि सोशल मीडियाच्या इन्फ्लुएंसर्सनी या शोमध्ये धमाकेबाज एंट्री घेतली आहे. पहिल्या ३ दिवसातच स्पर्धक नीरज गोयत हा शोमधून बाहेर पडला आहे. आता यानंतर आणखी एका स्पर्धकाची एक्सिट होणार असल्याच समोर आलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांच्या डोक्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे असं पाहायला मिळतंय.

कोण होणार बेघर ?
Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या सतत नवनवीन अपडेट्स समोर येत राहतात. अशातच आता शोबद्धल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्होटिंगचा ट्रेंड समोर आला आहे. घरातल्या ७ स्पर्धकांची नावं नॉमिनेशन लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आली. या यादीमध्ये पहिल्या लावॆश कटारिया, दुसऱ्या पायल मलिक, तिसऱ्या शिवानी कुमारी, चौथ्या साई केतन राव, पाचवा अरमान मलिक, सहाव्या सना सुलताना, आणि सातव्या क्रमांकावर दीपक चौरासिया आहे.

या फोटोमध्ये बाण शिवानी कुमारीच्या दिशेने दाखवला आहे. त्याच्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, निर्माता दीपक चौरासियाला बाहेर काढणार नाहीत. मात्र, शिवानी आणि दिपकमधून घराच्या बाहेर कोण पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काही लोकांनी कटारिया आणि साई सुरक्षित असल्याचं म्हंटलय तर शिवानी कुमारी एलिमिनेट झाल्याचे लिहिलंय.

‘बिग बॉस ओटीटी ३’मधून बॉक्सर असणारा नीरज गोयत बाहेर पडल्यानंतर घरामध्ये सना मकबूल, साई केतन राव, पौलामी दास, अरमान मलिक, शिवानी कुमारी, सना सुलताना, दीपक चौरसिया, पायल मलिक, कृतिका मलिक, दीपक चौरसिया, चंद्रिका दीक्षित, विशाल पांडे, लव कटारिया, मॅक्स एक्सटर्न, रॅपर नेझी हे स्पर्धक शोरमध्ये उरले आहेत.

Kalki 2898 AD ने मोडले ‘या’ चित्रपटांचे रेकॉर्ड्स; मात्र कमाईत घट

दरम्यान, शोमध्ये १५ स्पर्धकांमध्ये स्पर्धा चांगली रंगणार आहे. बिग बॉसने घरच्यांना ‘मॅजिक वेल’ हा टास्क दिला होता. या टास्कमध्ये पौलमी दासला चुकून शिवानीमुळे दुखापत सुद्धा झाली होती. पॉलमीने शिवणीवर जाणूनबुजून धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. अरमान मलिकने पॉलमीला उचलून काऊचवर ठेवलं. त्यांनतर बिग बॉसने शिवानी आणि रणवीर शौरीला एक विचित्र शिक्षा दिली, बिगबॉसने शिक्षा दिल्यानंतर शिवानी बेशुद्ध झाली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img