19.7 C
New York

Kundlik Khade : बीड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अटक

Published:

बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतरही वातावरण काही शांत झालेलं दिस नाही. (Arrested) नुकती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमध्यील पंकजा मुंडेंना कशी मदत केली नाही. धनंजय मुंडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या संदर्भातील संवाद आहे. (Kundlik Khade) या प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा देखील झाला आहे. (Beed) मात्र, त्यांच्यावर काही महिन्यापूर्वी 307 चा गुन्हा देखील दाखल झाला होता. खांडे यांना याच गुन्ह्यात अटक झाली आहे.

Kundlik Khade ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत

दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी 307 चा गुन्हा कुंडलिक खांडे यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयानं याच प्रकरणी आजच त्यांना जामीन नाकारला होता, बीड एलसीबीनं त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ऑडिओ व्हायरल प्रकरणी कुंडलिक खांडे चर्चेत आले होते. कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण व्हायरल झाल्यानंतर खाडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परळी पोलीस स्टेशनमध्ये हागुन्हा दाखल आहे.

रणजीत निंबाळकरांचा उपचारादरम्यान मृत्यू

Kundlik Khade प्रकरण काय?

बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मदत केल्याची कबुली कुंडलिक खांडे देत आहेत. तसंच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img