16.2 C
New York

Ladakh Tank Accident : लडाखमध्ये लष्कराच्या रणगाड्याला जलसमाधी ; 5 जवान शहीद

Published:

लडाखमधून यावेळी एक मोठी बातमी समोर आली आहे. (Ladakh Tank Accident) येथील दौलत बेग ओल्डी येथे लष्करी सराव सुरू असताना मोठा अपघात झाला. नदी ओलांडताना ५ जवान शहीद झाले आहेत. लष्कराचे जवान नदी ओलांडण्याचा सराव करत होते. यावेळी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने टॅंक पाण्याखाली अडकला. यात पाच जवान वाहून गेल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात अनेक जवानांना जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे.

हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लडाखजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवान टँकमध्ये बसून नदी ओलांडण्याचा सराव करत होते. त्यावेळी अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याचे सांगितले जात आहे. अचानक वाढलेल्या पाण्याच्या पातळीच टँक बुडाला. यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले आहेत. सध्या या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, या अपघातात आणखी जवान वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात,टँकर चालवत चौघांना उडवलं

आज (दि.29) शनिवारी पहाटे लडाखमधील न्योमा-चुशूल भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) टी-72 टँकमध्ये भारतीय लष्कराचे जवान नदी ओलांडण्याचा सराव करत होते. त्यावेळी अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने टँक बुडाला. हा अपघात लेहपासून 148 किमी अंतरावर असलेल्या मंदिर मोरजवळ पहाटे 1 वाजता लष्करी सरावादरम्यान घडल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. घटनेवेळी टँकमध्ये 5 जवान होते.

Ladakh Tank Accident चीनमुळे भारतीय लष्कर असते अलर्ट मोडवर

1962 मधील भारत-चीन युद्ध आणि नुकतेच पीएलएसोबत झालेला संघर्ष या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला याठिकाणी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते. मात्र, या ठिकाणी गस्त घालणे तितकेच कठीण असते. जून 2020 मध्ये झालेल्या संघर्षामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनने त्यांचे चार जवान मृत्यूमुखी पडल्याचं सांगितलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img