-2.8 C
New York

Pune Accident : पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात,टँकर चालवत चौघांना उडवलं

Published:

पोर्शे अपघातानंतर (Pune Porsche Accident) आणखी (Pune Accident) एका अल्पवयीन मुलाकडून पुण्यातील (Pune Latest Updates) वानवडीत (Vadavani Accident) आणखी एक भीषण अपघात. आणखी काहीजण टँकरच्या धडकेत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. टँकर एक 14 वर्षांचा मुलगा चालवत होता. त्यानं टँकरनं अनेकांना धडक दिली. अवघ्या 14 वर्षीय मुलाच्या ताब्यामध्ये अवजड टँकर दिल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. धक्कादायक म्हणजे टँकर चालक हा अल्पवयीन आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

‘हा’ महामार्ग मृत्यूचा ठरतोय सापळा

Pune Accident काय घडलं नेमकं?

सकाळच्या सुमारास वानवडी येथे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या काही मुलांसह बाइकस्वार महिलेला एका भरधाव टँकरने धडक दिल्याची घटना घडली. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महिलेसह काही मुले या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अपघातग्रस्त टँकर केवळ 14 वर्षीय मुलगा चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. या मुलाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी दुचाकीवरून जात होत्या. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्याचवेळी त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी प्रसंगावधान राखत या मुलींना बाहेर काढले. त्यानंतर टँकर चालक पळून जावू नये म्हणून नागरिकांनी अल्पवयीन मुलाला पकडून ठेवले. या अपघातात तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img