3.2 C
New York

Kranti Redkar: ‘देवापुढे नतमस्तक होते’, क्रांती रेडकरची ‘ती’ पोस्ट भावुक

Published:

Kranti Redkar: मनोरंजन विश्वातले अनेक कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत असतात. मग त्यांच्या खासगी आयुष्यामुळे, चित्रपटांमुळे, तर कधी सोशल मीडियाच्या पोस्टमुळे हे कलाकार चर्चेचा भाग बनलेले असतात. अशातच आता मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आई वडिलांसाठी एक भावुक कॅप्शन लिहिलं आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर अनेक मुलींच्या गोष्टींवर व्हिडिओ पोस्ट करत असते.

Kranti Redkar: क्रांती रेडकरने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक भावुक असा विडिओ शेअर केला आहे आणि त्यात तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “नुकताच माझ्या वडिलांचा ८४वा वाढदिवस आम्ही साजरा केला. आणि ते त्यांच्या आयुष्यात प्राण ओतणाऱ्या बायकोसोबत होते. खरं तर हे दोघेही एकमेकांच्या आयुष्यात असल्यामुळे आयुष्याला महत्व आणि पूर्णत्व येतं. ज्या जगामध्ये अगदी लोक स्वतःच्या जोडीदाराला सहजपणे सोडून देतात, त्या जगामध्ये हे दोघे आजही एकमेकांच्या सोबत आहेत. जगण्याचा व त्यांच्या आयुष्याचा प्रवास आजही दोघे अगदी एकमेकांच्या बरोबरीने, आनंदाने आणि प्रेमाने करत आहेत. मी तुझ्यासोबतच म्हातारा होईल असे जे काही म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माझे आई-वडील आहेत. जेव्हा मला माझ्या आयुष्यामधल्या उत्तम असणाऱ्या गोष्टी आठवतात, तेव्हा मला फक्त माझे आई-वडील आठवतात. दर एक दिवशी देवापुढे नतमस्तक होते तेव्हा माझे आई-वडील आजही माझ्यासोबत असल्याचे धन्यवाद देते , देवाची मी खूप आभारी आहे. मला माझ्या आई-वडिलांच्या रूपामध्ये ही दोन अतिशय अद्भुत असणारी माणसं मिळाल्याबद्धल मी देवाची चिरंतन कृतज्ञ आहे”, अशी भावुक कॅप्शन क्रांती रेडकरने आपल्या आई-वडिलांसाठी लिहिली आहे.

आता क्रांती रेडकरच्या या पोस्टवर चाहत्यांनीसुद्धा कमेंट करत तिच्या आई-वडिल्यांच्या जोडीचं भरभरून कौतुक केलं आहे. एका चाहत्याने म्हंटल की, ‘आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच मोठं भाग्य आहे. आपल्या हे पाहायला मिळतंय यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट नाही. असा गोडवा कायम राहू देत’, दुसऱ्या चाहत्याने म्हंटल की, ‘सगळ्यांनाच अशा जोडीदारासारखं सुख मिळो’, तर अनेकांनी अशी कमेंट केली की, ‘हा व्हिडिओ पाहून डोळ्यात अगदी पाणी आलं’. क्रांतीच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळतंय.

नीरज गोयतनंतर आणखी एक स्पर्धक होणार घराच्या बाहेर

दरम्यान, क्रांती रेडकर ही मराठी अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शक आहे. २००० मध्ये क्रांतीने ‘सून असावी अशी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं होत. मात्र, ‘कोंबडी पळाली’ या गाण्याने तर क्रांतीची चांदीच झाली. याबरोबरच, क्रांती रेडकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच चाहत्याने केलेल्या कमेंटमधले मराठी शब्द सुधरवल्याने क्रांती चर्चेत आली होती. अशातच अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकींबरोबर बोलके व्हिडिओ सारखे शेअर करत असते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img