21 C
New York

Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन गाड्यांचा चक्काचूर

Published:

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघात (accident)झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या चार जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नागपूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या कारला चुकीच्या बाजूने येणाऱ्या कारची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रात्री अकराच्या सुमारास नागपूरहून मुंबईकडे जाणारी आर्टिका आणि चुकीच्या बाजूने येणारी स्विफ्ट डिझायर यांची समोरासमोर धडक झाली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेली आर्टिका कार क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img