14.1 C
New York

Maharashtra Budget : शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत काय काय केल? अजित पवारांनी सांगितलं

Published:

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Session) आजचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात (Maharashtra Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली. तसेच काही नव्या योजनांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या १४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम ५१९० कोटी रुपये अदा करण्यात आली आहे. उर्वरित रकमेचेही वाटप लवकरात लवकर करण्यात येईल. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील १६ जिल्ह्यांसाठी ५४६९ कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वी पूर्ण करण्यात आल्या आहेत. या योजनांचा ६ हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांत राबवण्यात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्घत १५६१ कोटी ६४ लाख रुपये किमतीच्या ७६७ उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा लाभ सुमारे ९ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते. या अंतर्गत मे २०२४ पर्यंत ११ लाख ८५ हजार लाभार्थीना आतापर्यंत ११३ कोटी ३६ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत, अशे अजित पवार यांनी सांगितले

महिलांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा

खरीप हंगाम 2023 करिता राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काल तर १०२१ महसूल मंडळात दुष्कालसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळाचे पंचनामे जलद व्हावेत यासाठी नागपुरातीला ई-पंचनामा घेण्याची चाचणी यशस्वी झाल्याने ही पद्धत राज्यभर लागू करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत ९२ लाख ४३ हजार शेतकरी कुटुंबांना ५ हजार ३१८ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे. एका रुपयात पीकविमा योजनेअंतर्गत ५९ लाख ५७ हजार शेतकऱ्यांंना ३५०४ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्घत २६९४ शेतकरी कुटुंबांना ५२ कोटी ८२ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img