3.8 C
New York

Uddhav Thackeray : अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंचा ठाकरेस्टाईलने हल्लाबोल

Published:

मुंबई

राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक योजनांच्या घोषणा केली. दरम्यान, विरोधकांनी या अर्थसंकल्पावरून (Maharashtra Budget) सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हा अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचं आवतन आहे, अशी टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेनं लोकसभेला जो दणका दिला त्यानंतर राज्य सरकारने हे बजेट समोर ठेवलं आहे, पण जनता यांच्या भुलथापाला बळी पडणार नाही. काहीतरी धुळफेक करायची, जनतेला लुबाडायचं काम हे सरकार करत आहे. थापांचा महापूर, आश्वासनाची अतिवृष्टी म्हणजे आजचा अर्थसंकल्प आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत बोलायचं झालं तर खोटं नेरेटिव्ह पसरव्याचं काम या बजेटमधून केलं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आश्वासने आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही दणका त्यांना दिला, त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेस किलकिले झालेले दिसत आहे. तही देखील जनता त्यांच्या थांपावर विश्वास ठेवेल, असं मला वाटत नाही, महाराष्ट्रातील जनता ही सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी आहे. त्यांनी कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र ओरबडून गुजरातला नेण्याचं षडयंज्ञ उघड झालंय, महाराष्ट्र गुजरातच्या पाठी गेला आहे, असं ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका… माता बहीणींसाठी जरूर योजना आणा. पण, बेकार असलेल्या तरुण भावांसाठीही लाडका भाऊ, लाडका पुत्र अशी काहीतरी योजना आणा, असं ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन वर्षांमध्ये ज्या योजना जाहीर केल्या, त्या प्रत्यक्षात किती अमलात आल्या हे, एक तज्ज्ञांची समिती नेमून निवडणुकीपूर्वी एक श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक योजना अशा आहेत, ज्यांची घोषणा झाली पण प्रत्यक्षात आल्याच नाहीत. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ठ म्हणजे, महिलांची मते आपल्या बाजूने करून घेण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसते. हा अर्थसंकल्प की जुमला संकल्प आहे अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काहीतरी धुळफेक करायची, जनतेला फसावयचे आणि रेटून खोटं बोलायचे, पुन्हा सरकार आणून महाराष्ट्राला लुबाडायचे. निवडणूक जवळ आल्यानंतर अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर आहे. त्यामध्ये सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडून घ्यायचा प्रयत्न केला आहे. पण अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद कशी करणार? याबाबत कुठेही उल्लेख नाही. पंतप्रधान मोदी देणार आहेत का पैसे? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img