4.2 C
New York

Supriya Sule : पेपरफुटीवर चर्चेसाठी कामकाज स्थगित करा – सुळे

Published:

नवी दिल्ली

राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी’चे अपयश आणि NEET -UG परीक्षेतील पेपरफुटीचे (NEET Paper Leak) प्रकरण याबाबत सभागृहात आज सविस्तर चर्चा व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्षयांकडे स्थगन प्रस्ताव सादर केला आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट -युजी आणि युजीसी – नेट परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणावर चर्चा करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षयांकडे केली आहे.

खासदार सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, महाराष्ट्रातील आणि देशभरातील २५ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलेल्या नीट – युजी परीक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले, पण त्यावर सरकारच्या पातळीवर काहीही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे युजीसी – नेट परीक्षेचा पेपरदेखील फुटल्याचे प्रकरण समोर आले. पेपरफुटी प्रकरणामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीची उपयुक्तता आणि विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सरकारने विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याच्या या परीक्षा घेण्यात दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या प्रकरणात केवळ निष्काळजीपणाच दिसून येत नाही तर यात भ्रष्टाचारही झालेला आहे. त्यासाठी देशभरातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने मी विनंती करते कि, सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून आज दिवसभरातील सभागृहापुढील अन्य सर्व विषय बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करून कायमस्वरुपी तोडगा काढायला हवा. सभागृहाने यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img