3.5 C
New York

Asha Bhosle: थोडं सहन करा! “फार थोडे दिवस राहिलेत”, आशाताई झाल्या भावुक…

Published:

Asha Bhosle: पद्मविभूषण असलेल्या आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यावर ९० लेख आणि दुर्मिळ छायाचित्रांनी नटलेल्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकाचं आज (28 जून) प्रकाशन सोहळा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) हस्ते विलेपार्ले जवळ असलेल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे हा सोहळा पार पडला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अशोक सराफ, सुदेश भोसले, वैशाली सामंत तसंच जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, रवींद्र साठे, पद्मजा फेणाणी, उत्तरा केळकर हे सर्व गायक व कलाकार उपस्थित होते. यावेळी इथे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish shelar) सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) यांनी देखील हजेरी लावली होती. सोनू निगम यांनी आशाताईचें पाय गुलाबपाण्याने धुतले आणि पाय धुवून झाल्यानंतर आशाताईंच्या चरणी डोकं टेकवलं. कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी आशा भोसलेंच्या बऱ्याच आठवणी जाग्या केल्या. सोनू निगम यांनी आशाताईंच पाद्यपूजन करून त्यांना अभिवादन केलं.

सूर्या-बॉबीची भन्नाट झलक! ‘कंगुआ’ होणार दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज

स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक आठवण
Asha Bhosle: “मी स्वातंत्र्यवीर सावरकर याना भेटले होते. माझी आई त्यांना जेवण द्यायला जायची. दादरला आम्ही त्यांच्या घरी जायचो. त्यांनी मला सहजच विचारलं की, तू दीनानाथसारखी गाणं गातेस का? तेव्हा मी हो म्हंटल, पण त्यांच्यासारखं गायचं म्हणजे काय? मी गाणं गायले आणि ते म्हणाले आणखी जरा प्रॅक्टिस केली पाहिजेस”, अशी एक छोटी आठवण आशाताईंनी सांगितली.

लता दीदीची आठवण
आशाताई म्हणाल्या की, माझ्या आयुष्यात कधी असं पुस्तक प्रकाशित होईल असं मला कधीच वाटलं सुद्धा नव्हतं. आता माझं वय झालं आहे, फारच थोडे दिवस राहिले आहेत, असंच भरभरून प्रेम देत राहा, या शब्दात ज्येष्ठ गायिका आशाताई व्यक्त झाल्या. आशाताई भोसले यांनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) म्हणजे लता दीदीं यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की दीदीच्या नावाशिवाय हा कार्यक्रम अपुरा आहे आणि संपताही काम नये. मी घरातली तिसरी बहीण आहे. आमच्या बहिणींमधला एक पांडव जरी गेला तरीही मी अजून आहे. मला आमच्या घरी भीम बोलायचे. मोगरा फुलला हे गाणं दीदीच्या मुखात गोड वाटायचं. तिने आम्हाला सांभाळलं आणि अजूनही सांभाळते आहे.

माईक समोर आलं की घसा कोरडा पडतो
पुढे त्या म्हणाल्या, माझ्या आयुष्यात माझ्यासाठी अगदी पुस्तक तयार होईल, अशी कधी मी कल्पनाही केली नव्हती. माईकसमोर आलं की घसा एकदम कोरडा पडतो. ६० वर्षाची होते तेव्हा मी साडे ११ हजार गाणी गायली होती. जगभरात सगळ्यात जास्त रेकॉर्ड आहे माझा आवाज असं म्हणतात. याची नोंद गिनिज बुकानेहीसुद्धा घेतली आहे. मी सर्वाना प्रणाम करते, आणि मी या वयात नाही बोलले तर केव्हा बोलणार? थोडंस सहन करा. असंही त्यांनी सांगितलं. डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान आशा भोसले यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img