18.7 C
New York

Delhi Airport : दिल्लीच्या IGI विमानतळावरील टर्मिनल 1 चे छत कोसळले, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Published:

गुरुवारी दिल्ली विमानतळावर एक (Delhi Airport) अपघात झाला. येथे गुरुवारी अचानक विमानतळावरील पॅसेजच्या छताचा काही भाग कोसळला. यादरम्यान छताला आधार देणारे लोखंडी बाजू व वरचे खांबही तुटून पडले. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनावरील खांब पडल्याने वाहनाचेही पूर्ण नुकसान झाले. या घटनेने विमानतळावर एकच गोंधळ उडाला. जखमींना कसेबसे वाहनातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विमानतळ प्राधिकरणाने एक समिती स्थापन केली आहे.

DIAL (दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) च्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘सध्या टर्मिनल-1 वरून सर्व प्रस्थान (departure) रद्द करण्यात आले आहेत. चेक इन काउंटरही बंद करण्यात आले आहे. यापुढे काही काळासाठी येथून चेक-इन होणार नाही अथवा प्रस्थान होणार नाही. त्यासाठी दुसऱ्या टर्मिनलवर जावे लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. या अपघाताचे काही फोटो, व्हिडीओही समोर आले असून छत कोसळल्यामुळे त्याखाली दबल्या गेलेल्या गाड्यांची काय दुरावस्था झाली आहे, त्याचे विदारक दृश्य त्यामध्ये दिसत आहे. ज्या गाड्यांचे नुकसान झाले, त्यामध्ये बहुतांश गाड्या या टॅक्सी आहेत. नेमक्या किती गाड्यांचे नुकसान झालंय, ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही

Delhi Airport विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये अपघात

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये टर्मिनल 1 च्या छताचा काही भाग कोसळला. त्यामुळे कॅबसह अनेक वाहनांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागालाही घटनेची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, टर्मिनल 1 बाजूच्या छताचे पत्रे आणि सपोर्ट बीम कोसळल्यामुळे प्रवाशांसाठी विमानतळ ड्रॉप आणि पिकअप क्षेत्रात हा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात पुढील दोन दिवस अतीमुसळधार पाऊस; IMD चा इशारा

Delhi Airport अनेक फ्लाईट्स रद्द

दिल्ली विमानतळावर झालेल्या या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले तसेच गाड्याही दबल्या गेल्याने मोठे नुकसान झाले. मोठ्या मुश्किलीने तेथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे तसेच दिल्लीत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे टर्मिनल-1 येथून होणारे प्रस्थान बंद करण्यात आले आहे. सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत तसेच तेथील चेक-इन काऊंटरही बंद करण्यात आले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीपासून आत्तापर्यंत दिल्ली विनातळावरून उड्डाण करणारी 16 तर विमानतळावर येणारी 12 विमानं रद्द करण्यात आली आहेत.

Delhi Airport स्पाइसजेटची उड्डाणे रद्द

“खराब हवामानामुळे (मुसळधार पाऊस) स्पाईसजेटची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पर्यायी ऑप्शनसाठी किंवा पूर्ण रिफंडसाठी आमच्याशी +91 (0)124 4983410/+91 (0)124 7101600 या नंबरवर संपर्क साधा किंवा http://changes.spicejet.com या वेबसाईटला भेट द्या. पुढील अपडेट्ससाठी आमच्या सोशल मिडिया चॅनलवर नजर ठेवा, असे स्पाईसजेटतर्फे सांगण्यात आले आहे.

Delhi Airport केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी माहिती घेतली

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनीही विमानतळ अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली. ते म्हणाले की, दिल्ली विमानतळावर छत कोसळण्याच्या घटनेवर ते स्वतः लक्ष ठेवून आहेत. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्याबरोबरच जखमींवर चांगल्या उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Delhi Airport दिल्लीत मुसळधार पावसामुळे छत कोसळल्याची चर्चा

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे छताचे पत्रे आणि सपोर्ट बीम तुटून पडल्याची चर्चा विमानतळावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img