4 C
New York

Monsoon Session : संयमी नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक

Published:

कायम शांत असणारे, संयम ठेवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आज सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मोठे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांच्या मदतीवर थोरात म्हणाले, एकंदर मागील वर्ष पाणी टंचाईच होत. परंतु, काही शेतकऱ्यांनी शेती पिकवली. (Assembly Session) परंतु, जो अवकाळी पाऊस झाला. (Monsoon Session) त्यामध्ये मोठं मोठं वादळ होतं. फळ बागांसह शेतकऱ्याची पिकं कोलमडून पडली होती. कोणतंच उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालं नाही. हे सगळं झालं असताना फक्त कागद फिरत राहतात असा थेट घणाघात थोरात यांनी यावेळी केला.

अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प मांडणार

सरकार म्हणून तुमच्या मनात शेतकऱ्यांविषयी कोणताचं ओलावा नाही. कसलीच सहानूभुती नाही. सहा महिन्यानंतर आता सांगतायेत असा सर्वे येणार आहे. तसा सर्वे येणार आहे. फार फार तर दोन महिन्यांत मदत व्हायला हवी होती. परंतु, सहा सहा महिने मदत होत नसेल तर काय म्हणायचं. ही अशी कधीच पद्धत नव्हती अस म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी थेट प्रश्न उपस्थित करत सरकारवर नाकर्तेपणाचा थेट आरोप केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img