टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनल सामन्यात (T20 World Cup) टीम इंडियाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत (IND vs ENG) फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचे फलंदाज अडकले. या सामन्यात भारतीय संघाने 68 धावांनी विजय मिळवला. सामना जिंकल्यानंतर असा एक प्रसंग घडला ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. खरंतर सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) भावूक झाला. त्याचे डोळे पाणावले होते. त्याचा हा फोटोही वेगाने व्हायरल होत आहे.
या समन्यात इंग्लंडला भारताने (India vs England) सर्वबाद करत टी-20 विश्वचषक 2022 मधील उपांत्य फेरीतील 10 विकेट्सच्या पराभवाचा व्याजासकट बदला घेतलाय. 2022 टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 169 धावा केल्या होत्या. त्याचवेळी इंग्लंडने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठलं होतं. त्यानंतर भारतीय संघानेही इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवत आपला बदला पूर्ण केला.
पाकिस्तानचा टीम इंडियावर ‘हा’ गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण ?
बटलरच्या संघाला भारताने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात करून दिली. बटलरने अर्शदीपच्या तिसऱ्या षटकात 3 चौकार लगावत भारताला धक्का दिला होता. मात्र, रोहित शर्माने फिरकीपटूला साजेशा खेळपट्टीवर स्पिन अटॅक सुरू केला. अक्षर पटेलला चौथं षटक देण्यात आलं आणि त्याने पहिल्याच चेंडूवर बटलरला बाद करत मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर बुमराहने पुढच्या षटकात भेदक गोलंदाजी करत फिल सॉल्टला क्लीन बोल्ड केलं तिथच भारताने विजय निश्चित केला होता.
IND vs ENG ..अन् रोहितच्या डोळ्यांत पाणी
सामना संपल्यानंतर रोहित ड्रेसिंग रुमच्या बाहेर खुर्चीवर बसला होता. त्यावेळी रोहितचे डोळे पाणावले होते. याआधी एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. हा पराभव भारताच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. इंग्लंडनेही याआधीच्या टी 20 विश्वचषकात भारताला असाच धक्का दिला होता. त्यामुळे भारताने दोन्ही संघांना पराभूत करत हिशोब चुकता केला. यानंतर जेव्हा खेळाडू ड्रेसिंग रुमकडे परतत होते तेव्हा रोहित शर्माचे डोळे पाणावल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याचवेळी विराट कोहली रोहितजवळ आला त्याने हात मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रोहित कमालीचा भावूक झाला. त्याचा हात डोळ्यांकडे गेला आणि अश्रू पुसले.