23.1 C
New York

Devendra Fadanvis : हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प- फडणवीस

Published:

मुंबई

खोट्या अफवा पसरवून लोकसभेमध्ये काही जागा मिळवल्याने विरोधकांना थोडा उत्साह आला होता. मात्र या अर्थसंकल्पाने (Maharashtra Budget) त्यांचा तो उत्साह देखील संपवला आहे. असा टोला फडणवीसांनी (Devendra Fadanvis) लगावाला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवारांनी एकत्रित माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाचे लोक बोलत होते. मात्र त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता आणि चेहऱ्यावरती नूर नव्हता. त्यांचे चेहरे उतरलेले होते. केवळ टीका करत होते. तसेच अर्थसंकल्पावर काय बोलायचं ते अगोदरच लिहून आणतात. त्यामुळे अर्थसंकल्प कसाही सादर केला असता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रगतीशील सर्व समावेशक, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशाप्रकारचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला आहे. विशेषत: शेतकरी, महिला, युवा आणि मागसवर्गीय अशा सर्व घटकांना समर्पित अशाप्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. उद्धव ठाकरे म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे, पण हा थापांचा नाही तर आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहेत, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेच्या माध्यमातून 45 लाख शेतकऱ्यांना वीजमाफी दिली जाणार आहे. यासाठी 7777 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. सौर ऊर्जा योजना याच्या अंमलबजावणीचा विचार सुद्धा केला आहे. 18 महिन्यात ही योजना पूर्ण करायची आहे, त्यामुळे 30 टक्के अनुदान मिळणार आहे. सर्व कृषिफिडर सौर उर्जेवर आणणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देऊ शकणार आहोत. 9.5 लाख सौरऊर्जा पंप मंजूर केले आहेत. यापुढेही जो अर्ज करेल, त्याला ते मंजूर केले जाणार आहेत. यामुळे 90 टक्के शेतकरी हे मोफत विजेचे लाभार्थी होणार आहेत. सोबतच उपसा सिंचन योजनेचे सौर उर्जिकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि 1 रुपयात पीकविमा यासारख्या योजना सुरूच राहणार आहेत. दुधाला 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img