21 C
New York

Kanguva: सूर्या-बॉबीची भन्नाट झलक! ‘कंगुआ’ होणार दसऱ्याच्या मुहूर्तावर रिलीज

Published:

Kanguva: साऊथ सुपरस्टार असलेल्या सूर्याचा (Suriya) बहुप्रतीक्षित ‘कंगुवा’ (Kanguva) चित्रपट हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलीवूडचा बॉबी देओल (Bobby Deol) सुद्धा खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. बॉबी देओलची आश्रम वेब सिरीज ही खूप गाजलेली होती आणि त्यामुळेच बॉबी देओलच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे चाहते आता आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. ‘कंगुवा’ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. बहुप्रतिक्षित असलेला ‘कंगुवा’ चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच हा चित्रपट अजून एका चित्रपटासोबत क्लॅश होणार असल्याचं म्हंटल जातंय.

Kanguva: साऊथ इंडस्ट्रीव्यतिरिक्त हिंदी प्रेक्षकांमध्येही सूर्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तर दुसरीकडे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असलेला बॉबी देओल हा देखील खतरनाक दैत्याकार रूपात दिसणार आहे, अशातच बॉबी देओलचे चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बजेट असणारं ‘कंगुवा’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटांपैकी एक आहे. अखेर, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘कंगुवा’ प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे.

अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजवर, म्हणाली…

अभिनेता सूर्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत चित्रपट रिलीजची अपडेट दिली आहे. ‘कंगुवा’ चित्रपटाचं एक पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत १० ऑक्टोबरला रिलीज होईल असं सांगितलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सूर्य एका हातात तलवार घेऊन उभा आहे. यावर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘कंगुवा’ ऑक्टोबर १० ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय बॉलीवूडची दिशा पटानी (Disha Patani) ही अभिनेत्री या चित्रपटात झळकणार आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर आलिया भटचा (Alia Bhatt) ‘जिगरा’ (Jigra) चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे. ‘कंगुवा’ चित्रपट १० ऑक्टोबर रिलीज होणार तर दुसऱ्याच दिवशी ११ तारखेला ‘जिगरा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘जिगरा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन वासन बाळा (Vasan Bala) यांच्याकडे आहे, तर या चित्रपटात आलिया सोबत वेदांग रैनाही (Vedang Raina) झळकणार आहेत. याआधी चित्रपट ‘जिगरा’ २७ सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता सूर्याचा ‘कंगुवा’ आणि आलियाचा ‘जिगरा’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार असून यामध्ये नेमकी बाजी कोण मारणार हे पाहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img