शंकर जाधव, डोंबिवलीकल्याण तळोजा मेट्रो (Kalyan Taloja Metro) रेल्वेच्या कामासाठी जागेचे सर्वेक्षण नंतर करा पहिल्यांदा माेबदला द्या अशी भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेत जागेच्या सर्वेक्षणास विरोध. हा प्रकार डोंबिवली गावडे सोनार पाडा उंबरली रोड येथील माणगाव परिसरात घडला. दरम्यान अधिकारी व कर्मचा-यांनी पाेलिस बंदाेबस्तात कामास प्रारंभ केला.
कल्याण तळोजा मेट्रोची ठाणे जिल्ह्यातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. या मेट्रोच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. या मेट्रोच्या कामा साठी सोनारपाडा, उंबार्ली रोड, माणगाव परिसरातील जागा राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग केली आहे. मात्र आता या कामाला सोनारपाडा परिसरातील शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला करत आम्ही अनेक वर्षा पासून या ठिकाणी शेती करत असून रेल्वेच्या या कामाला आमचा विरोध असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत कामाला विरोध असल्याच्या हरकती नोंदवली असून आमच्या हरकतीवर सुनावणी केल्यानंतर कामाला सुरुवात करावी अशी मागणी यावेळी केली मात्र सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निवेदन घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्त घेत सर्वेक्षनाचे काम सुरु केला असून आता सोनारपाडा परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.