3 C
New York

Hina Khan: अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजवर, म्हणाली…

Published:

Hina Khan: अभिनेत्री हिना खान (Hina Khan) तिच्या दिलखेच अदा आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. हिना खान सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या प्रसिद्ध मालिकेतून हिना सर्वांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेतून स्वतःच एक वेगळं स्थान अभिनेत्रीने बनवलं आहे. परंतु, हिना खानच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ३७ वर्षीय असणाऱ्या हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं (Breast Cancer) निदान झालं आहे आणि तिसऱ्या स्टेजवर असल्याची माहिती खुद्द अभिनेत्री हिना खानने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

Hina Khan: हीन खानने पोस्टमध्ये लिहिलंय की, “माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी करणाऱ्या चाहत्यांना मला एक बातमी स्वतःहून शेअर करायची आहे. मला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून तो तिसऱ्या स्टेजवरचा आहे. मी खूप स्ट्राँग आहे आणि मी आजारातून लवकरच बरी होणार आहे. यावर माझे उपचार चालू असून मी पूर्णतः बरी होण्यासाठी सर्व काही करायला तयार आहे. या दिवसात मला थोडी स्वतःसाठी प्रायव्हसी हवी आहे. तुमच्या प्रेमाची आणि ताकदीची मला पूर्ण जाणीव आहे. या खडतर प्रवासातून मला जाताना तुमच्या पाठिंब्याचा आणि अनुभवाचा नक्कीच उपयोग होईल. मी माझ्या कुटुंबासोबत सकारात्मक आहे आणि राहीन. या सगळ्या प्रवासातून मी पूर्ण बरी होईल हा मला विश्वास आहे. तुमच्या प्रार्थना, प्रेम आणि आशीर्वादांची खूप गरज आहे.

“भांग पिऊन नाटक करणं”, नवाजुद्दीन सिद्दिकीने केलं मोठे वक्तव्य

हिना खानच्या या पोस्टमुळे चाहत्यांना धक्का बसला असून चाहते दुखी आहेत. चाहत्यांनी तिला या पोस्टवर काळजी घेण्याचं आणि लवकरात लवकर बरी होण्याच्या कमेंट्स केल्या आहेत. हिना खानने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून हिनाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. हिना खानने ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ या रिएलिटी शोमध्येसुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर अनलॉक, डॅमेज या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img