नवी दिल्ली
कथित भुखंड घोटाळा प्रकरणात ईडीच्या (ED)अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंंत होरेन (Hemant Soren) यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सोरेन यांना कथित जमिन घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर (Bail) करण्यात आला आहे.
कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी न्यायालयाने सोरेन यांना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. 13 जून रोजी या प्रकरणी सुनावणी झाली होती. आज न्यायालयाने आपला निकाल दिला.
31 जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मधल्या काळात ते काही दिवस बाहेरही आले होते. आता तब्बल पाच महिन्यानंतर सोरेन यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.