4.2 C
New York

Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस अतीमुसळधार पाऊस; IMD चा इशारा

Published:

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा (Weather Update) जोर ओसरला होता. राजधानी मुंबईसह काही जिल्ह्यांत (Pune Rains) मात्र पाऊस सुरू होता तर काही ठिकाणी पावसाने ओढ (Rain Alert) दिली होती. आता या पावसाबाबत हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात मान्सून सक्रिय झाला आहे. आज सकाळपासूनच दिल्लीत (Delhi Rain) जोरदार पाऊस सुरू आहे. तासाभराच्य पावसानेच येथे पाणी साचलं आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोकण, मराठवाड्यातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल. पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात अनेक ठिकाणी (Heavy Rain) मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस (Monsoon Update) होईल. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांनाह यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत मात्र हवामान कोरडे राहिल अशी शक्यता आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जोरदार पाऊस होणार असल्याने अशा वेळी नागरिकांनी झाडाखाली थांबू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

आयुष्यमान योजनेंतर्गत आता 70 वर्षांपुढील सर्वांचे मोफत उपचार

दरम्यान, महाराष्ट्रात आल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीला ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. पावसाचा जोर राज्यात ओसरला असून, गेल्या सहा दिवसांपासून त्याच्या वाटचालीत फारशी प्रगती झाली नाही, अशी माहिती हवामान खात्याने रविवारी दिली. सध्या राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. विदर्भात कमाल तापमान पुन्हा चाळीशीपार गेले आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील चंद्रपूर येथे ४१.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. बम्हपुरी आणि वर्धा येथे पारा ४० अंशांपार आहे. याच बरोबर मान्सून येत्या काही दिवसांत उत्तर भारतासह इतर राज्यांत पोहोचण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये मान्सून दाखल झाला आहे तर राजस्थानमध्ये 30 जून आणि 5 जुलै दरम्यान मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही राज्यांत मान्सून दाखल झाला असून येथे जोरदार पाऊस सुरू झाला आहे. राजधानी दिल्लीत सध्या जोरदार पाऊस होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img