शंकर जाधव, डोंबिवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आदेशानुसार महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ (Dr. Indu Rani Jakhad) यांनी गुरुवार 27 तारखेला दुपारी संपन्न झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार (Dombivli) महापालिकेच्या प्रभागातील सहायक आयुक्तांनी विभागीय उपायुक्त रमेश मिसाळ व अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांचे मार्गदर्शनाखाली अनधिकृत बार, टप-या इत्यादींवर निष्कासनाची धडक कारवाई शुक्रवार 28 तारखेला सुरु केली. सर्व शाळांच्या आजूबाजूला 100 मी. अंतरापर्यंत असलेल्या पान, तंबाखू व मद्य इ. दुकाने व टप-यांवर कारवाई सुरु करण्यात आली असून 4 दुकानांचा माल जप्त करुन मोहर सिलबंद करण्यात आले. त्यातील एका दुकानात आक्षेपर्य सामान आढळून आल्यामुळे विष्णूनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ई’ प्रभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप व ‘फ’ प्रभागाचे सहा.आयुक्त भारत पवार यांनी काटई कोळेगाव येथील तळ + 3 मजली साई कृपा रुक्मिणी हॉटेलवर निष्कासनाची धडक कारवाई 2 जेसीबी, 1 पोकलेन सहाय्याने, महापालिका पोलीस कर्मचारी, मानपाडा पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारीस्थानकातील पोलीस यांच्या मदतीने गुरुवार रात्री उशिरापर्यंत केली. निष्कासनाची उर्वरित कारवाई आज करण्यात येत आहे.
‘फ’ प्रभागात सहायकआयुक्त भारत पवार यांनी 1 जेसीबी व 1 गॅसकटरच्या सहाय्याने, महापालिका पोलीस कर्मचारी व टिळकनगर पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आज शिल्पा बार जमिनदोस्त करण्याची कारवाई सुरु केली आहे.
‘आय’ प्रभागात सहायक आयुक्त किशोर ठाकुर यांनी कशिश बार ॲन्ड रेस्टॉरंट व रंगिला बार ॲन्ड रेस्टॉरंट निष्कासन करण्याची कारवाई काल रात्री सुरु केली. उर्वरित कारवाई आज करण्यात येत आहे.
‘ह’ प्रभागात डोंबिवली (पश्चिम) परिसरातील सर्व शाळांच्या आजूबाजूला 100 मी. अंतरापर्यंत असलेल्या पान, तंबाखू व मद्य इ. दुकाने व टप-यांवर कारवाई सुरु करण्यात आली असून 4 दुकानांचा माल जप्त करुन मोहर सिलबंद करण्यात आले. त्यातील एका दुकानात आक्षेपर्य सामान आढळून आल्यामुळे विष्णूनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ग’ प्रभागाचे सहा.आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी प्रभागात शाळा व कॉलेज परिसरातील अनधिकृत टप-यांवर काल कारवाई केली.
‘ब’प्रभागात सहा.आयुक्त सोनम देशमुख यांनी मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज रोड, सिंडीकेट परिसरातील शाळा व कॉलेज परिसरापासून 100 मी. च्या आत असलेल्या अनधिकृत टप-यांवर निष्कासनाची कारवाई केली. स्मार्टसिटी रोड व खडकपाडा परिसरातील फुड स्टॉलवर निष्कासनाची कारवाई केली. त्याचप्रमाणे कोळीवली येथील जे बी लाऊंजवर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली.
‘जे’ प्रभागात सहायक आयुक्त सविता हिले यांनी फेरीवाला हटाव पथकातील कर्मचा-यांच्या मदतीने शाळांच्या परिसरातील गुटखा, तंबाखू विक्री करणा-या टप-यांवर निष्कासनाची कारवाई केली.