3.5 C
New York

Kalyan : कल्याणमध्ये घराचे छत कोसळून कुटुंबातील चार जण जखमी

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

मुसळधार पावसामुळे कल्याण मधील एका घराचे छत कोसळून कुटुंबातील चार जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार 28 तारखेला दुपारच्या सुमारास घडली. जखमीमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. जोरदार पावसामुळे कल्याण (Kalyan) पूर्वेतील लोकग्राम न्यु जिम्मी बाग परिसरातील चाळीतील चंद्रपुरकर चाळीतील हरी ओम प्रजापती यांच्या घराचे छत कोसळले. घरात कुटुंब झोपले असताना ही घटना घडली. या घटनेत चार जण जखमी झाले. या जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या चारही जणांना कल्याण -डाेंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शिवपूजन प्रजापती (२५) ,प्रिन्स प्रजापती (१३) , ललिता प्रजापती (३२) ,उर्मिला प्रजापती (४५) ,ज्योती प्रजापती (१६) ,प्राची प्रजापती (१८) यांचा समावेश आहे. जखमीना उपचारासाठी तातडीने महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दाखळ करण्यात आले आहे. या घटनेविषयी श्रीकांत प्रजापती यांनी सांगितले की, ते कामावर गेले होते. रोज दुपारी देत कामावरुन घरी जेवायला येतात. ते कामावरुन घरी जेवायला येत होते. त्यांना थोडा उशिर झाला. घराजवळ पोहताच त्यांच्या कानावर एक मोठा असा आवाज आला. त्यांनी पाहिले तर घराचा पत्रा कोसळून चार जण जखमी झाले आहे. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णलायात नेले.या घटनेची माहिती मिळताच शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी जखमीना भेट घेऊन त्यांचे घर पुन्हा उभे करणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img