महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणारं हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. (Interim Budget ) लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने विरोधक उत्साहात आहेत. तर सत्ताधारी आता मोठ्या मोठ्या घोषण्या करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतय. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार या पंचवार्षिकमधाल शेवटचा (Budget 2024) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोठ्या-मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात मराठा आरक्षण, अल्पसंख्याक कल्याण आणि शेतकरी, यांच्यासह मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसंच, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, पेपरलीक घोटाळा, ओबीसी आरक्षण असे अनेक मुद्दे गाजल्याने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील दोन दिवस अतीमुसळधार पाऊस; IMD चा इशारा
Interim Budget 5 हजार रुपयांचा भत्ता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव तरतूद करू शकते. तसंच, महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1200 ते 1500 रुपये देण्याची शक्यता आहे. तसंच, राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी दरमहा 5 हजार रुपयांचा भत्ता देण्याची घोषणा केली जाऊ शकते.
Interim Budget महिला सक्षमीकर
अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणाबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी काल माहिती दिली. राज्यातील आंगणवाडी सेविका व मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे भरण्यात आली असून, इतर रिक्त पदं भरण्यासाठी काम सुरू आहे. कुपोषणाच्या समस्या रोखण्यासाठी राज्यात नागरी बाल विकास केंद्र सुरु करण्यात आली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी दहा शहरातील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा योजना राबवणार, विदर्भातील काही जिल्हे आणि पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न असलेले 430 खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहेत.