T20 वर्ल्ड कप 2024 चा दुसरा सेमीफायनल सामना टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) झाला. टीम इंडियाने इंग्लंडवर 68 धावांनी गुयाना येथे झालेल्या सामन्याच दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2022 T20 वर्ल्ड कप सेमीफायनलमधील पराभवाचा बदला घेतला. गतविजेत्या इंग्लिश टीमने भारतीय स्पिनर्ससमोर पूर्णपणे शरणागती पत्करली. जॉस बटलरची टीम 103 रन्सवर ऑलआऊट झाली. इंग्लंडच्या या पराभवाने माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर मायकल वॉन खूप निराश झाले. त्यांनी टीम इंडियाला टुर्नामेंटमधील सर्वश्रेष्ठ टीम म्हटलं. पण बोलता-बोलता मनातील दु:ख देखील प्रगट केलं. रविचंद्रन अश्विनने वॉनला भारताच्या या विजयानंतर वेगळ्या पद्धतीने डिवचलं. मायकल वॉनची भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने सुद्धा फिरकी घेतली.
इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्न विकेट गमावल्या. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीपुढं इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. भारतानं विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचे माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी एक खोचक ट्वीट केलं आहे. इंग्लंडचे माजी कॅप्टन मायकल वॉन यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील मॅच संदर्भात त्यांची मतं व्यक्त केली आहेत. भारताविरुद्ध पराभव झाल्यानं इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभव झाल्यानं त्यांचं आव्हान संपुष्ठात आलं.
भारत-दक्षिण आफ्रिकाच्या अंतिम सामन्यात पाऊस आला तर ?
भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपलं. माजी कॅप्टन मायकल वॉन यांनी इंग्लंडच्या टीमच्या कामगिरीवर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी म्हटलं की दक्षिण आफ्रिकेला जोस बटरच्या टीमनं पराभूत केलं असतं तर सेमी फायनल खेळण्याची त्यांना त्रिनिदादमध्ये संधी मिळाली असती. अंतिम फेरीच्या लढतीत इंग्लंडनं तिथं विजय मिळवला असता तर ते पोहोचले असते. गयानाचं ग्राऊंड भारतासाठी चांगलं होतं, असं देखील मायकल वॉन म्हणाले.
IND vs ENG हरभजन सिंहने वॉनला खडसावले
प्रत्युत्तरात हरभजन यांनी मायकल वॉनला खडसावले, “भारतासाठी गयाना चांगली जागा होती असे तुम्हाला वाटते का? दोन्ही संघ एकाच मैदानावर खेळले, इंग्लंडने नाणेफेक जिंकली त्याचा फायदा त्यांना व्हायला हवा होता खरंतर, मूर्ख बनणे थांबवा, भारताने सर्व विभागांमध्ये इंग्लंडचा पराभव केला, वस्तुस्थिती स्वीकारा आणि पुढे जा आणि तुमची बकवास स्वतःकडे ठेवा, तर्क बद्दल बोला मूर्खपणाचे नाही.”
फायनल फेरीत भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना २९ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकाने सेमीफायनल फेरीत अफगाणिस्तानला लोळवले आणि फायनल फेरी गाठली. दक्षिण आफ्रिकेने प्रथमच वर्ल्डकपमध्ये एंट्री घेतली आहे.