21 C
New York

Ajit Pawar : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अजित पवारांकडून घोषणा

Published:

मुंबई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर. ही महत्वाकांक्षी योजना असून महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेच्या मार्फत दरमहा दीड हजार रुपये देण्यात येणार असून या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून होणार असून दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहितीही अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात दिली. ते अर्थसंकल्प सादरीकरणात बोलत होते.

स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. या महिलांना सधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी घोषणा करत आहे. ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल.

अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीदेखील सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजपा, शिवसेना व अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी कंबर कसून कामाला लागण्याचे निर्देश आपल्या राज्यातील पक्षसंघटनेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img