शेतकऱ्यांसाठी काम करायला सरकार कटिबद्ध आहे. (Maharashtra Budget) शासनाने 2023-24 पासून नमो शेतकरी सन्मान योजना पिक विम्यासाठी, नैसगिक आपत्तीत झालेल्या नुकासानामुळे 15 हजा दोनशे पंचेचाळीस कोटी इतकी मदत करण्यात आली. आता नुकसान झालेल्या क्षेत्राची वाढ करून ती तीन एकर करण्यात आली आहे. (Mansoon Session ) त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामे जलद होण्यासाठी (Maharashtra Assembly) आता इ पंचनामा प्रणाली राज्यात वापरली जाणार आहे असंही अजित पवार आपल्या घोषणेमध्ये म्हणाले आहेत.
नियमीत कर्जफेट करणाऱ्या शेतकऱ्यांना रक्कम अदा केली असून उर्वरीत रक्कम लवकरच दिली जाणार आहे. केशरी शिदाधार कुटुंबांना थेट रक्कम दिली जाते. त्यामध्येही पूर्ण रक्कम देण्यात आली आहे. तसंच, शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणुकीसाठी गाव तिथं गोदाम ही योजना राबवली जाणार आहे. तसंच, जे गोदाम आहेत त्यांची दुरुस्थिही केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच अनुदान दिलं जाणार आहे असंही अजित पवारांनी आपल्या घोषणांमध्ये सांगितलं. त्याचबरोबर कापूर, किंवा पिकांसाठी झालेल्या नुकसानासाठी प्रती हेक्टर 5 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महिलांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा
कांदा आणि कापूस खरेदीच्या हमीभावानुसार फिरता निधी निर्माण करण्यात येणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत देण्यात आली आहे. त्याचबरोबर, पशुखाद्य, पशुंची संख्या वाढवण, दुग्ध व्यावसाय वाढवण्याठी नोंदनीकृत दोन लाख 93 हजार गायींच्या उत्पादकांना अनुदान वितरीत करण्यात आलं आहे. तसंच, एक जुलैपासून प्रतिलीटरवर 5रुपये अनुदान देण्याची घोषणाही अजित पवारांनी यावेळी केली. तसंच, शेळी-मेंढी व्यावसायासाठी मेंढी पालणं आणि कुकुट पालणासाठीही प्रोस्ताहण देण्यात येणार आहे.
बांबु लागवडीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. तसंच, राज्यातील पडीक जमिनीवर बांबू लावण्याची योजना आहे असंही अजित पवाल यावेळी म्हणाले. शेती पिकांचं नुकसान झाल्यास आता 50 हजार रुपये मिळणार आहेत. तसंच, विविध सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठं अर्थसाहाय्य देण्यात आलं आहे.