राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Session) आजचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात (Maharashtra Budget) सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली. तसेच काही नव्या योजनांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. अजित पवार यांनी यावेळी राज्य सरकारची महत्वाकांधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.
निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी, देहू आळंदी पंढरपूर मार्गावरील वारकरऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करणार आहे. प्रतिदिंडी 20 हजार रुपये निधी देणार आहोत. लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, बस प्रवासात सवलत, शक्ती सदन योजना अशा योजनांची अंमलबजावणी सरकारकडून केली जात असल्याचे अजित पवार म्हणाले.
‘त्या’ आरोपावर अध्यक्षांची तंबी अन् पटोलेंची माघार
१० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत करणार. सरकारी रूग्णालयात गर्भाशय कर्करोगाची तपासणी केली जाणार. प्रत्येक मुलीला महिन्याला दीड हजार रूपये मिळणार. लाडकी बहिण योजनांसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी निधी दिला जाईल असे स्पष्ट करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या नव्या योजनेची घोषणा केली.
आर्थिक वर्ष 2023-24 चा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल काल सादर करण्यात आला होता. या अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था 7.6 टक्के दराने प्रगती करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला. देशाच्या अर्थव्यवस्थेतही 7.6 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांनी जोरदार घोषणा देत सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला.
सन 2011 -12 ते 2022-23 मध्ये देशाच्या सांकेतिक स्थूल उत्पन्नात राज्याचा हिस्सा 13.9 टक्के असून त्या पाठोपाठ तामिळनाडूचा (8.7 टक्के) हिस्सा आहे. 2023-24 च्य पूर्वानुमानुसार राज्य अर्थव्यवस्था 7.6 टक्के तर देशाची अर्थव्यवस्थाही 7.6 टक्क वाढणे अपेक्षित आहे. या अहवालानुसार कृषी व निगडीत कार्यात राज्यात 1.9 टक्के वाढ अपेक्षित आहे. उद्योग क्षेत्रात 7.6 टक्के तर सेवा क्षेत्रात 8.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. या अहवालानुसार राज्याचं स्थूल आर्थिक उत्पन्न 40.44 लाख कोटी रुपये इतकं आहे.