26 C
New York

Uddhav Thackeray : मविआचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? ठाकरेंनी सांगितलं

Published:

या सरकारला लाज, शरम अस काहीच राहिलेलं नाही. हे लिकेज सरकार आहे. पेपर लीक होतोय, राम मंदिर लीक होऊन त्याला गळती लागली आहे. (Uddhav Thackeray) हे सगळ होत असताना आम्ही प्रश्न उपस्थित केले की हे घटनाबाह्य सराकमधील लोक आमच्यावर टीका करतात. परंतु, थोडीही संवेदना या सरकारला नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (BJP government) ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही योग्यवेळी जाहीर करू असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे.

Uddhav Thackeray अंमलबजावणी करा फक्त घोषणा नको

जुना काळ गेला. अनेक घरांमध्ये कर्त्या पुरुषासारखं महिलाही कर्त्या असतात. त्यामुळे लाडली बहिण योजनेसारखी लाडला भाऊ आणा असं म्हणत बहिण आणि भावामध्ये बेधभाव करू नका असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. फक्त लाडली बहिण योजना नको तर लडला भाऊही योजना असावी. तसंच, जी काही योजना आणतान त्याची अंबलबजावणी करून निवडणुकांना सामोरं जा. फक्त घोषणा करून नको असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, विधानपरिषदेची निवडणूक झाली तर मोठी गंम्मत होणार आहे. कोण कुणाला अंधारातून पेडे भरवतय ते त्यावेळी कळेल असं खोचक विधानही त्यांनी यावेळी केलं.

देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंशी भेट, एकाच लिफ्टमधून…

Uddhav Thackeray फक्त चॉकलेट नको

चंद्रकांत पाटील यांनी मला आज चॉकलेट दिली. असं योजनांच चॉकलेट देऊन का भागवू नका. कामाची अंमलबजावणी झाली पाहिजे असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे. हा गाजराचा अर्थसंकल्प आहे. गाजर दाखवा आणि पुढे चाला असं या सरकारचं काम आहे. त्याचबरोबर आज रोज एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल तर या सरकारने केंद्र सरकारची मदत घेत शेतकऱ्यांकडं पाहाव. परंतु, सत्तेच्या आवेशात हे सरकार शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करत आहे असंही ते म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray काठावर आलेलं हे सरकार

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की पाच दिवसांत चौकशी करा. परंतु, कुठून करणार? पैसे आहेत का? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. परंतु, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे काम करणार आहोत. तसंच, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत असंही ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर ठाकरे यांनी यावेळी केंद्र सरकारवही जोरदार टीका केली. बळच आलेलं हे सरकार आहे असंही ते म्हणाले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे, आमदार सुरेश प्रभू उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img