21 C
New York

Monsoon Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

Published:

मुंबई

राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) आज गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. महायुतीच्या शिंदे सरकारचं (Eknath Shinde) हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. शिंदे सरकारच्या शेवटच्या अधिवेशन हे अनेक मुद्द्यांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून राज्य सरकारला आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारी, पिक विमा यासह विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आज राज्य सरकार विरोधात (Mahavikas Aghadi) पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून राज्य सरकार विरोधात आंदोलन केले.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कमिशनखोर आणि टक्केवारी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी यावेळी विरोधकांकडून करण्यात आली. यावेळी सरकारचा निषेध करण्यासाठी विरोधकांच्या हातात विविध घोषणांचे फलकही पाहायला मिळाले.

विरोधकांचे आंदोलन सुरू असतानात यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी विधान भवन परिसरात आले. ज्यानंतर विरोधकांनी आणखी जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. ज्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ विरोधकांना हात दाखवत तिथून काढता पाय घेतला. विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या आंदोलनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार अस्लम शेख, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, रवींद्र धंगेकर, भाई जगताप व अन्य आमदार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img