25.1 C
New York

Amartya Sen : नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांचे हिंदू राष्ट्राबद्दल मोठं विधान

Published:

नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी अनेक विषयावर भाष्य केलं आहे. (Amartya Sen) त्यांनी ‘भारत हे हिंदू राष्ट्र नाही’ असं वक्तव्य केलं आहे. अलीकडील लोकसभा निवडणुकीचे निकाल हे दर्शवतात की भारत ‘हिंदू राष्ट्र’ नाही असं ते म्हणाले आहेत. सेन हे अमेरिकेतून कोलकात्याला आले आहेत. (Nobel Laureate) यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे. दरम्यान, नवीन व्यवस्थेत ‘सुनावणी शिवाय’ तुरुंगात टाकलं जात आहे असं म्हणत त्यांनी याबद्दलही खेदही व्यक्त केला आहे.

Amartya Sen भारताला हिंदू राष्ट्र बनवण अयोग्य

नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर अमर्त्य सेन एका बंगाली वृत्तवाहिनीशी बोलत होते. “भारत हिंदू राष्ट्र नाही, हे निवडणूक निकालांमधून स्पष्ट होतं. आपण नेहमी प्रत्येक निवडणुकीनंतर बदलाची अपेक्षा करतो. आधी (भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या काळात) काय घडलं? यामध्ये लोकांना सुनावणी शिवाय तुरुंगात टाकणं, श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढवणं, ते अजूनही चालू आहे. हे थांबवायला हवे, अंसही सेन यावेळी म्हणाले. राजकीय दृष्ट्या खुले विचार असणं आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि याचा संविधानदेखील धर्मनिरपेक्ष आहे. मला वाटत नाही की भारताला ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्याची कल्पना योग्य आहे असं स्पष्ट भाष्यही त्यांनी यावेळी केलं.

राष्ट्रपती आज संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार

Amartya Sen काँग्रेसदेखील यासाठी दोषी

जेव्हा मी लहान होतो तेव्हा भारत ब्रिटिश शासनाच्या अधीन होता. लोकांना सुनावणी शिवाय तुरुंगात टाकलं जात होतं. त्यावेळी माझ्या अनेक काका आणि चुलतभावांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आम्हाला आशा होती की भारत यापासून मुक्त होईल. काँग्रेसदेखील यासाठी दोषी आहे की त्यांनी यात काही बदल केला नाही. परंतु, सध्याच्या सरकारमध्ये या गोष्टी जास्त प्रमाणात होत आहेत असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

Amartya Sen प्राथमिक शिक्षणाबद्दल चिंता

अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामानंतरही भाजपने फैजाबाद लोकसभा सीट गमावल्याबद्दल सेन यांनी सांगितलं की, देशाची खरी ओळख दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतका पैसा खर्च करून राम मंदिराचं बांधकाम करण्यात आलं. भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून चित्रित करणं, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशात हे होणार नाही. ही भारताची खरी ओळख दडपण्याचा प्रयत्न आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसंच, सेन यांनी भारतात बेरोजगारी, प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक आरोग्यसेवेचा उल्लेख करत खंत व्यक्त केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img