19.7 C
New York

Nawazuddin Siddiqui: “भांग पिऊन नाटक करणं”, नवाजुद्दीन सिद्दिकीने केलं मोठे वक्तव्य

Published:

Nawazuddin Siddiqui: बॉलीवूडमधलं आणि मनोरंजन विश्वातल नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) हे नाव तर जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. अनेक दमदार अभिनय करत या अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये आपलं एक वेगळस स्थान निर्माण केलं. चित्रपटातली भूमिका कोणतीही असूदेत; मात्र प्रत्येक भूमिकेला न्याय मिळवून देण्यासाठी जा कलाकाराचं नाव घेतलं जातं त्यापैकीच नवाजुद्दीन सिद्दिकी हे सुप्रसिद्ध असलेलं नाव आहे. यूट्यूबवरील पॉडकास्ट कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत, नवाजुद्दीन यांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामधल्या अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. सिगारेटचे त्यांना कसे व्यसन होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर कशाप्रकारे झाला त्याबद्धल त्यांनी वक्तव्य केलं आहे.

Nawazuddin Siddiqui: दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन यांनी म्हंटल, ” मला प्रचंड सिगारेट ओढण्याचं व्यसन लागलं होत आणि मी पूर्णपणे त्याच्या आहारी गेलो होतो. पण, व्यसन कायमच सुरु ठेवणं हे चांगलेपणाचं लक्षण नाही हे माझ्या लक्षात आलं. पुढे म्हणाले, मी अशा लोकांच्या सोबतीस होतो; जे सतत सिगारेट ओढत असायचे आणि मला सुद्धा सिगारेट ओढण्यासाठी प्रोत्साहन करायचे आणि मीदेखील तेच करायचो. त्यानंतर मला ही गोष्ट चांगलीच लक्षात आली. व्यसन करणं अयोग्य आहे; पण त्यात मज्जा खूप होती. मी खरंच या गोष्टींना प्रोत्साहन देऊ इच्छित नाहीये, ती चूकच आहे आणि मी त्याबद्धल माफी सुद्धा मागतो. सिगारेटशिवाय मी भांगसुद्धा प्यायचो. विशेषतः होळीला भांग पिऊन नाटक करणं हे माझ्यासाठी सामान्य होत. भांग प्यायल्यानंतर वाटायचं की, मी जगातला सगळ्यात मोठा सुपरस्टार आहे आणि माझं सादरीकरण जे लोक पाहणारे प्रेक्षक असून पूर्ण जग माझं व्यासपीठ आहे. कधी मी कृष्ण व्हायचो, कधी अश्वत्थामा, तर कधी कर्ण बनवायचो. मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सादरीकरणच करत असायचो. याचा परिणाम फक्त असा झाला की, इतर वेळेलासुद्धा मी नाटकातलं संभाषण सतत म्हणायचो. शेवटी लोक मला म्हणायचे, तुला काय वेड लागलाय का? मी कुठेही म्हणजे बागेत, बसमध्ये किव्हा इतर कुठे जिथे वाटेल तिथे सादरीकरणच करायचो.

‘एक घर देऊ शकत नाही’, रणवीर शौरीने केला खुलासा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासूनच नवाजुद्दी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेच चर्चेत होता. नवाजुद्दीन यांच्या कामाबद्धल बोलायचं झाल्यास, २०२३ च्या वर्षात ‘जोगिरा सारा रा रा’, ‘टिकू वेड्स शेरू’,‘अफवाह’,आणि हड्डी यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. नवाजुद्दीन यांची रौतू का राज ही वेब सीरिज लवकरच भेटीस येणार आहे. नवाजुद्दीन आता कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img