23.1 C
New York

Monsoon Session : देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंशी भेट, एकाच लिफ्टमधून…

Published:

मुंबई

राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशनाला (Assembly Monsoon Session) आजपासून सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारचे (Shinde Govt) हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. आज पहिल्याच दिवशी विरोधकांकडून विधानभवनाच्या पायऱ्या व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर राज्य सरकारचे महत्त्वाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विधानसभेतील दालनात भेट घेतल्याने या भेटीची राजकीय चर्चा विधानभवन परिसरात चांगलीच रंगले आहे. या भेटीनंतर दोघांमध्ये हस्तविनोद होताना दिसला. तर, त्यानंतर एकाच लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच लिफ्टमधून विधानभवनात गेले. लिफ्टमध्ये जाताना दोघांमध्ये चर्चा होताना दिसून आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) आधी वेगळं समीकरण दिसणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाला नेहमी शेवटच्या दिवशी हजर राहणारे उद्धव ठाकरे आज पहिल्याच दिवशी हजर राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे भाजप नेते आणि राज्याच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत स्वागत केले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांची भेट घेतली. यावेळी विधान परिषदेचे उमेदवार अनिल परबही उपस्थित होते. या भेटीत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांना चॉकलेट भेट दिले. तसेच तुम्हाला निकालाच्या आधीच शुभेच्छा देतो, असे म्हणत अनिल परब यांना पेढाही भरवला.

विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही विधानभवन परिसरात भेट झाली. देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. अनेक वर्षांनंतर जुने सहकारी एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img