3.8 C
New York

Milk Price : दूध दरावर तोडगा निघणार? विधीमंडळात शनिवारी महत्त्वाची बैठक

Published:

मुंबई

राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढी (Milk Price) संदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकरी यांची महत्वाची बैठक येत्या शनिवार 29 जून 2024 रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर तोडगा काढला जाणार आहे.

या बैठकीला राज्यातील खाजगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी सांगितले. सदर बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात येईल व या बैठकीचा अहवाल मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात येईल. तसेच लवकरच दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे आयुक्तांनी सांगितले.

राज्यात पशुखाद्याचे दर सातत्याने वाढत आहेत. राज्यातील अनेक भागात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. औषधोपचार व अनुषंगिक खर्च वाढल्याने दुधाचा उत्पादन खर्च सहन करण्याच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकार व राज्याचे दुग्धविकास मंत्री मात्र अजूनही निवडणुकीच्या माहोलमधून बाहेर येताना दिसत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर अखेर दुध उत्पादकांना तीव्र आंदोलना शिवाय पर्याय राहणार नसल्याची भूमिका दूध उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी नेते मांडत आहेत.  

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img