5.3 C
New York

Dhanagar Reservation : धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधानभवनात आज बैठक

Published:

मुंबई

राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशनाला (Assembly Monsoon Session) आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील आरक्षणाच्या (Reservation) विषयावर सध्या राज्यात वातावरण तापलेले आहे. विरोधकांनी पहिल्याच दिवशी आरक्षणासह राज्यातील अन्य विषयांवर राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. धनगर समाजाच्या (Dhanagar Reservation) मागण्या संदर्भात विधिमंडळात ओबीसी मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी तातडीची बैठक बोलवली आहे.

चौंडी इथं सुरु असलेल्या उपोषणकर्त्यांसोबत राज्य शासन चर्चा असून धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात विधीमंडळात बैठक पार पडणार आहे. यासाठी ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज सावेंच्या दालनात दुपारी २ वाजता ही बैठक होणार आहे.

या बैठकीला ओबीसी मंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री उपस्थित राहणार आहेत. धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या यशवंत सेनेच्या प्रतिनिधींना या चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं आहे. सध्या चौंडी इथं आपल्या विविध मागण्यांसाठी धनगर समाजाकडून उपोषण सुरु आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img