शंकर जाधव, डोंबिवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार अनधिकृत बार, ढाबे, गुटखा पार्लर यांच्यावर कारवाई सुरु आहे. त्यांच्यावर पोलीस विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. त्याची यादी त्यांनी महापालिकेस (KDMC) दिली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने पुढील आठवड्याभरात तीव्र गतीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ (Dr. Indu Rani Jakhar) यांनी दिली आहे.
गुरुवार 27 तारखेला महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी गुरुवार 27 तारखेला पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकारी, महापालिकेच्या सर्व प्रभागाचे सहा.आयुक्त व इतर अधिकारी वर्ग यांच्याबरोबर पार पडलेल्या बैठकीत दिले.या बैठकीत परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, महापालिका विभागीय उपआयुक्त, कल्याण व डोंबिवलीतील सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकारी, महापालिकेच्या सर्व प्रभागाचे सहा.आयुक्त व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बार, गुटखा पार्लर, ढाबे, टप-या व इतर ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जाते, अशा ठिकाणी त्वरीत कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. या संदर्भात महापालिकेच्या प्रभागातील सहा. आयुक्तांनी यापूर्वीच नोटीसा बजाविल्या असून पुढील कार्यवाही आता सुरु करण्यांत आली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. जाखड यांनी यावेळी दिली.ज्या अनधिकृत बार, ढाबे, गुटखा पार्लर आहेत त्यांच्यावर पोलीस विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. त्याची यादी त्यांनी महापालिकेस दिली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने पुढील आठवड्याभरात तीव्र गतीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली आहे.