3.5 C
New York

Ratan Tata: “मुंबईकरांनो मला हेल्प करा”, खुद्द रतन टाटा यांनी मुंबईकरांकडे केलं आवाहन…

Published:

Ratan Tata: देशातले तसंच जगातले प्रसिद्ध उद्योगपती असलेले रतन टाटा (Ratan Tata) यांनी मुंबईकरांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. तुम्हाला वाटत असेल की जगातल्या सर्वात मोठे श्रीमंत व्यक्ती असलेले टाटा याना कोणत्या मदतीची गरज का भासेल? खरं आहे, मात्र रतन टाटा जेवढे मोठे व्यक्ती आहेत तितकच एक उदार व्यक्ती सुद्धा आहेत आणि खूप मोठे श्वानप्रेमीसुद्धा आहेत. एका आजारी असणाऱ्या कुत्र्यासाठी त्यांनी मुंबईकरांची मदत मागितली आहे.

Ratan Tata: रतन टाटा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नागरिकांना विनंती केली आहे, की मुंबईमधील संचालक असलेल्या रतन टाटा यांच्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या ७ महिन्याच्या कुत्र्याला रक्ताची गरज आहे. यासाठी ते रक्तदाता शोधत आहेत. यासाठी मदत करावी असं त्यांनी आवाहन केले आहे. याबाबतची पोस्ट टाटा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असून ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये टाटा यांनी आजारी असणाऱ्या श्वानाचा फोटो आणि या श्वानाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेली माहिती कॅप्शनमध्ये दिलेली आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे.

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन : जाणून घ्या इतिहास

नेहमीच प्राण्यांना मदत करणारे उद्योगपती रतन टाटा एका श्वानाच्या उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून मदत घेणार आहेत. रतन टाटा यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर श्वानाचा फोटो शेअर करून कॅप्शन मध्ये लिहिलं की, मुंबईकरांनो मला तुमच्या मदतीची गरज आहे. मुंबईमधील स्मॉल ॲनिमल हॉस्पिटलमध्ये एका जखमी झालेल्या श्वानावर उपचार सुरु आहेत. वास्तविक, जखमी कुत्र्याच्या रक्तदात्याच्या मी शोधात आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून ह्या पोस्ट ला ५ लाखांच्यावर लाईक्स मिळाले आहेत आणि त्यात सातत्याने वाढसुद्धा होत आहे. नेटकरी ही पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

अशातच, मुंबईमधलं ऐतिहासिक काळातील असलेलं ताज पॅलेस हॉटेलबाहेरील जागांमध्ये झोपणाऱ्या किंवा बसणाऱ्या श्वानांना हाकलायचं नाही, असे निर्देश सुद्धा रतन टाटा यांनी हॉटेलमधल्या सर्व कर्मचाऱ्यांना दिले होते. हेसुद्धा सोशल मीडिया पोस्टमधून शेअर केल होत. अख्या जगभरात रतन टाटा यांच्या संवेदनशील मनाचं कौतुक केलं होत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img