19.7 C
New York

Ranvir Shorey: ‘एक घर देऊ शकत नाही’, रणवीर शौरीने केला खुलासा

Published:

Ranvir Shorey: बॉलिवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात मग ते चित्रपट असूदेत, सोशल मीडियाच्या पोस्ट, नाही तर त्यांच वैयक्तिक आयुष्य असूदेत या सगळ्या गोष्टींवरून ते चर्चांचा भाग बनतात. आता बिग बॉस ओटीटी ३ (Big Boss OTT 3) च्या घरात अभिनेता रणवीर शौरी (Ranvir Shorey) हा स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. रणवीर हा स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्धल घरातल्या इतर सदस्यांजवळ व्यक्त होताना दिसत आहे. त्याने आपल्या माजी पत्नी कोंकणा सेन शर्मासोबत (Konkona Sen Sharma) पालकत्व कसं पार पाडलं जात यावरती संवाद केला आहे.

Ranvir Shorey: नुकताच बिग बॉस ओटीटी ३च्या प्रदर्शित झालेल्या भागामध्ये अरमान मलिक याच्याबरोबर संवाद करताना रणवीर शौरी म्हणाला, “मी माझ्या घरी एकटाच राहतो. माझा मुलगा ‘हारून’ एक आठवडा माझ्याकडे असतो, तर एक आठवडा त्याच्या आईकडे असतो. मुलासाठी जेवढं त्याच्या पालकांनी जवळ राहणं गरजेचं असतं तेवढेच प्रयत्न आम्ही करतो. आम्ही दोघे त्याला एक घर देऊ तर शकत नाही पण गोष्टी सहज आणि सोप्या राहतील यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो. पुढे म्हणाला की, घटस्फोट झाल्यानंतरही मी आणि कोंकणा एकमेकांच्या संपर्कात असतो. मला अजून पण वाटत नाही की, मी पुन्हा एखाद्या नवीन नात्यासाठी तयार आहे. कारण सध्या मी माझ्या कामात खूप खुश आहे.”

सप्टेंबर २०१० मध्ये रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर मार्च २०११ मध्ये दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी हारून असं ठेवलं. मात्र, काही कारणास्तव हे जोडपं २०१५ मध्ये वेगळं झालं. आमच्या घरस्फोटानंतर कोंकणाने सोशल मीडियावर व्यक्त होताना म्हटलेलं की, “मी आणि रणवीरने एकमेकांच्या संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पण आम्ही यापुढेदेखील एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण राहू आणि आमचा मुलगा हारूनच सहपालकत्व निभावू.”

रणवीर आणि कोंकणा यांनी एकत्र काम केलेले चित्रपट
रजत शर्मा दिग्दर्शित ‘मिक्स्ड डबल्स’ (Mixed Doubles) या चित्रपटात रणवीर आणि कोंकणा यांनी एकत्र काम केलं होत. २००६ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. २००७ मध्ये अनिल मेहता दिग्दर्शित ‘आजा नच ले’(Aja Nachle) या चित्रपटात दिसले होते. यानंतर अनंत महादेवन यांच्या ‘गौर हरी दास्तान’(Gour Hari Dastaan) या चित्रपटांतदेखील दोघांनी एकत्र काम केल. अशातच कोंकणा सेन – शर्मा हिने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटात ‘ए डेथ इन गुंज’ (A Death in the Gunj) मध्ये रणवीर अभिनय करताना दिसला होता.

‘अब मिलेंगे मिलेंगे’… आता ‘हे’ दोन कलाकार दिसतील संसदेत

दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, कोंकणा नुकतीच अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘किलर सूप’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. ‘किलर सूप'(Killer Soup) हि वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. आणि आता लवकरच ‘मेट्रो इन दिनो’ (Metro In Dino) अनुराग बसू यांच्या रोमँटिक चित्रपटात दिसणार आहे. रणवीर शौरी हा ‘टायगर ३’(Tiger 3) मध्ये शेवटचा झळकला होता. सध्या बिग बॉस ओटीटी ३ च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला असून, तो त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी इतर सदस्यांबरोबर व्यक्त होताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img