22.3 C
New York

Chirag Paswan: ‘अब मिलेंगे मिलेंगे’… आता ‘हे’ दोन कलाकार दिसतील संसदेत

Published:

Chirag Paswan: केंद्रीय मंत्री झालेले चिराग पासवान (Chirag Paswan) आणि भाजप खासदार कंगना राणौत (Kangna Ranaut) याआधी दोघांनी एकत्र एका चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केलं आहे. काल हे दोघे एकत्र संसदेत जाताना दिसले. दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. चिराग आणि कंगनाचा ‘मिले ना मिले हम’ (Miley na Miley Hum) हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झालेला या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलेलं. मात्र, चित्रपट इतका चालला नव्हता. या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये यश न मिळाल्याने चिराग पासवान यांनी त्याचे दिवंगत वडील रामविलास पासवान यांच्या सावलीत राजकारणामध्ये पाऊल ठेवलं. तर दुसरीकडे क्वीन कंगनाने अनेक बॉलिवूडचे हिट चित्रपट दिले आणि आता क्वीन खासदार म्हणून संसदेत पोहोचली आहे.

कंगना-चिराग यांच पुनर्मिलन
Chirag Paswan: नुकताच कंगना आणि चिराग यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संसद भवनाच्या बाहेरील हा व्हिडिओ आहे. चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. संसदेत पोहोचताच कंगना आणि चिराग यांची गळाभेट झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, चिराग आणि कंगना एकमेकांची गळाभेट घेतात आणि यानंतर ते दोघे काहीतरी आपआपसात बोलताना दिसतात. नंतर कंगना चिरागला हसत टाळी देते आणि मग दोघे हसत जातात. संसदेत चालत जातात एकमेकांचा हात पकडूनच जाताना दिसतात. हा व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊन व्हिडिओला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. कंगना आणि चिरागचे फॅन्स त्यांच्या रोमँटिक भेटीचा अँगल लावत आहेत तर दुसरीकडे चाहत्यांना ही जोडी प्रचंड आवडतेय असं पाहायला मिळतंय.

प्रवास चिराग पासवान यांचा
२०११ मध्ये चित्रपट केल्यानंतर आता चित्रपटाच्या सेटवर नव्हे तर थेट दोघेजण संसदेत झळकणार आहेत. चिराग पासवान यांनी वडिलांच्या म्हणजे दिवंगत रामविलास पासवान यांच्या निधनानंतर स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. LJP चं नेतृत्व आता चिराग पासवान करत आहेत जे एनडीएचा एक भाग आहेत. या लोकसभा निवडणुकीमध्ये लढलेल्या पाचही जागा त्यांनी जिंकून दाखवल्या आहेत. चिराग पासवान याना कॅबिनेट मंत्रीच पददेखील मिळालं आहे.

पूर्वा कौशिकने शेअर केला ‘शिवा’ मालिकेतील भन्नाट किस्सा

क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच खासदार
तर दुसरीकडे, क्वीन कंगना रानौत पहिल्यांदाच खासदार झाली आहे. कंगना ही हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडणूक जिंकून आली आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून कंगनाने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आणि आता राजकरणी म्हणून संसदेत तिचा बुलंद आवाज ती दाखवणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना रणौत आता तिच्या ‘इमर्जन्सी’ (Emergency) चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. ‘इमर्जन्सी हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img