23.1 C
New York

World Anti Drug Day : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन : जाणून घ्या इतिहास

Published:

World Anti Drug Day : दरवर्षीप्रमाणे २६ जून हा ‘आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन’ (World Anti Drug Day) म्हणून पाळला जातो. अमली पदार्थ आणि पदार्थांच्या प्रतिबंधासाठी, ‘युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली’ने (United Nations General Assembly) 7 डिसेंबर 1987 रोजी हा ठराव मंजूर केला होता आणि त्या दिवसापासून दरवर्षी अमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याचा उद्देश म्हणूनच जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जातो. नशेमध्ये असणाऱ्या किंवा अडकलेल्या लोकांचं जीवन वाचवणे, जागरूकता करणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे. चला तर या निमित्ताने जाणून घेऊयात या दिवसाचा इतिहास आणि महत्व.

World Anti Drug Day : अमली पदार्थांचे व्यसन हा एक असा आजार आहे जो की तरुण पिढीवर सतत परिणाम करत असतो आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आजारी बनवत आहे. आजकाल तरुणांचा मोठा वर्ग जो आहे तो सिगारेट, तंबाखू, दारू यांसारख्या विषारी पदार्थांच्या आहारी जात आहे. आजच्या काळात रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा फूटपाथवर दिसणारी मुलेही ड्रग्जच्या आहारी गेलीली आहेत. अशा पदार्थांच्या आहारी गेली असल्यामुळे त्यांना तेच हवं हवंस वाटू लागलेलं आहे.

जगातील 18 कोटी मुलांची उपासमार

याचा इतिहास काय सांगतो?
२६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने डिसेंबर १९८७ मध्ये घोषित केलेला. हा दिवस पदार्थाचे सेवन करून एखाद्याच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर कशाप्रकारे दुष्परिणाम होती, आणि यामुळेच एखाद्या व्यक्तीच संपूर्ण आयुष्य कसं उध्वस्त होऊ शकतं याबद्धल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

या दिनाचे महत्व काय?
हा दिवस साजरा करण्यामागचा कारण असं की, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. जगभरातल्या शाळा, महाविद्यालये, कामाची ठिकाणं आणि सार्वजनिक ठिकाणे या विषयावरती जागरूकता निर्माण व्हावी तसंच ड्रग्ज आणि त्याच्या सेवनाच्या जोखमीविषयी माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img