8 C
New York

Ashadhi Wari : राहुल गांधीची भारत जोडोनंतर आता आषाढी वारी?

Published:

मुंबई

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचा आशीर्वाद पदरात पाडून घेण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या या पंढरपूरला (Pandharpur wari) जात असतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. ते 7 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभाही होणार आहेत. पंढरीला जाणारी आषाढी वारी ही महाराष्ट्रातील अनेक वर्षांपासून चालत आलेली महत्त्वाची परंपरा राहिली आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. या वारीत आता राहुल गांधीही सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात राहणाऱ्या पांडुरंगाचा उत्सव. महाराष्ट्रातील या वारीने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकांना अचंबित केलं आणि या वारीत सामील होण्यास भाग पाडलं. अशा या वारीत सामील होण्यापासून राहुल गांधीही स्वत: रोखू शकणार नसल्याचं दिसतंय. यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत. 

दारम्यान, पंढरीच्या वारीत महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. दरवर्षी बारा लाखांहून अधिक भाविक आषाढी वारीत सामील होतात. सुमारे महिनाभरापासून महाराष्ट्रातील गावखेड्यातील नागरीक आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या वारीत आता राहुल गांधी सामील होणार आहेत. ते 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर आषाढी वारीतही त्यांनी सहभागी व्हावं यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे माळशिरस ते वेळापूर या दरम्यान, राहुल गांधी प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकतात.

काँग्रेस पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी हे पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी होण्याविषयी विचार करत आहेत. राज्यात येत्या तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास काँग्रेस पक्षासाठी ते फायदेशीर ठरु शकते. राहुल गांधी यांनी यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हजारो किलोमीटरची पायपीट केली आहे. त्यामुळे पंढरीच्या वारीत चालणे त्यांच्यासाठी सहजसोपी गोष्ट ठरु शकते. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img