विरोधी पक्षांना लोकसभेचं उपाध्यक्ष पद न दिल्याने त्यांनी अखेर लोकसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्याचं ठरवलं. आज अध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे. (Lok Sabha ) सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला हे उमेदवार आहेत. तर, इंडिया आघाडीने के. सुरेश यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक परस्परांच्या ताकदीची चाचपणी करणारी निवडणूक असणार आहे. (Speaker Election) विशेष म्हणजे १९७६ नंतर तब्बल ४८ वर्षांनी या सर्वोच्च पदासाठी निवडणूक होत आहे. १९५२ आणि १९६७ मध्ये लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली आहे.
Speaker Election १९५२ मध्ये निवडणूक
विद्यमान संसदही स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीमध्ये केंद्रीय विधानसभा होती. सुधारणांच्या आधारे मॉंटेग्यू- चेम्सफर्ड अस्तित्वात आलेल्या या पहिल्यांदा १९२५ मध्ये केंद्रीय सभेसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये विठ्ठलभाई पटेल हे पहिले बिगर सरकारी अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर संसदेमध्ये लोकसभा अध्यक्ष पदासाठी १९५२ मध्ये निवडणूक झाली होती.
Speaker Election १९६७ मध्ये निवडणूक
या निवडणुकीत काँग्रेसचे जी. व्ही. मावळंकर हे निवडून आले होते. शांताराम मोरे यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. यामध्ये मावळंकर यांना ३९४ तर शांताराम मोरे यांना ५५ मतं मिळाली होती. त्यानंतर १९६७ मध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत टेनेटी विश्वनाथम आणि नीलम संजीव रेड्डी हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते.
लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच होणार निवडणूक
Speaker Election बळिराम भगत विजयी
लोकसभा अध्यक्ष पदासाठी १९७६ मध्ये निवडणूक झाली होती. बळिराम भगत त काँग्रेसचे नेते या विजयी झाले होते. इंदिरा गांधींनी बळिराम भगत यांच्या निवडीचा प्रस्ताव ५ जानेवारी १९७६ ला झालेल्या या निवडणुकीत मांडला होता. त्यांच्याविरुद्ध जनसंघाचे नेते जगन्नाथराव जोशी यांनी निवडणूक लढवली होती. भगत यांना ३४४ तर जोशी यांना ५८ मते मिळाली होती.
Speaker Election संगमांच्या नावाचा प्रस्ताव
याचबरोबर १९९८ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी पी. ए. संगमा यांचा लोकसभेमध्ये अध्यक्षपदी निवडीसाठी प्रस्ताव मांडला होता. अर्थात या प्रस्तावाला पाठिंबा मिळाला नाही. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तेलुगू देसम पक्षाचे जी. एम. सी बालयोगी यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव संमत झाला होता.