विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसंच शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार (Vidhan Parishad Election) मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. (Mlc Polls) रोजगार आणि पेपर लिक हे प्रकरणं गाजत असताना ( Voting ) पदवीधर मतदानासाठी येतात की नाही अंशी चिंता सर्वच उमेदवारांना आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आपापली यंत्रणा कामाला लावली आहे. कोकण आणि नाशिकमध्ये तालुका पातळीवर उमेदरवारांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडं जबाबदारी सोपवली आहे. जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यावर सर्वच उमेदवारांचा भर असेल. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यात रस्सीखेच आहे. असे असले तरी मुंबई शिक्षक मतदार संघात, नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीच्याच घटक पक्षांमध्ये आपापसात लढत रंगणार आहे.
Vidhan Parishad Election मुंबई शिक्षक मतदार संघ
मुंबई शिक्षक मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ज. मो. अभ्यंकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आहे. तर भाजपकडून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे काम करणारे शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनी यंदा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्याकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे महायुतीचा धर्म न पाळता एकनाथ शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे हे पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी नलावडे हे निवडणूक लढवत आहेत.
लोकसभा अध्यक्षपदासाठी यापूर्वी कधी झाली होती लढत ?
Vidhan Parishad Election मुंबई पदवीधर मतदार संघ
मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाकडून किरण शेलार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आहे. या दोघांमध्ये अतिशय चुरशीची अशी लढत या मतदारसंघात होणार आहे.
Vidhan Parishad Election कोकण पदवीधर मतदार संघ
कोकण पदवीधर मतदार संघामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेकडून अभिजीत पानसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं होतं. परंतु देवेंद्र फडवणीस यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघांमध्ये भाजपाकडून निरंजन डावखरे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. निरंजन डावखरे हे या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर या मतदारसंघात काँग्रेसकडून रमेश कीर यांना उमेदवारी देण्यात आली.
Vidhan Parishad Election नाशिक शिक्षकमध्ये २१ उमेदवार
एकूण २१ उमेदवार विधान परिषद निवडणुकीसाठी नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून आपले नशीब अजमावत आहेत. तथापि मुख्य लढत ही शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, उद्धव ठाकरे गटाचे संदीप गोपाळराव गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यात आहे.