टी 20 विश्वचषकात अफगाणिस्तानने बांगलादेशवर थरारक (AFG vs BAN) विजय मिळवत सेमी फायनलमध्ये (IND vs ENG) एन्ट्री घेतली. अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपमधून बाहेर पडला. आता सेमी फायनलच चित्र स्पष्ट झालं आहे. सेमी फायनलमध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे चार संघ पोहोचले आहेत. ग्रुप 2 मधील पहिल्या क्रमांकावर असलेला दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सेमी फायनल सामना होणार आहे तर दुसरा सेमी फायनल सामना भारत विरुद्ध इंग्लंड होणार आहे.
पहिला सेमी फायनल सामना उद्या रात्री साडेआठ (T 20 World Cup 2024) वाजता ब्रायन लारा स्टेडियमवर होणार आहे. तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गुरुवारी रात्री आठ वाजता गयानातील प्रोविडेंस स्टेडियमवर होणार आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच सांगितले जात होते की सेमी फायनलमध्ये भारतीय संघ दुसरा सामना खेळेल. याचे कारण सामन्याची वेळ आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना गुरुवारी रात्री आठ वाजता सुरू होईल.
ऑस्ट्रेलियाच्या ‘ह्या’ दिग्गज फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा
या दोन्ही सामन्यांसाठी प्लेइंग कंडीशन मात्र वेगवेगळ्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. कारण हा सामना आणि फायनल सामन्यात फक्त एक दिवसाचं अंतर ठेवण्यात आलं आहे. पण तरीही दोन्ही सामन्यांसाठी एकूण 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये खेळ पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 60 मिनिट आणि राखीव दिवसाला 190 मिनिटं उपलब्ध असतील. दुसऱ्या सेमी फायनलचा सामना 250 मिनिटात पूर्ण करावा लागणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवस नाही.
या व्यतिरिक्त सेमी फायनल आणि फायनल सामन्यात निकाल लागण्यासाठी किमान दहा षटकांचा खेळ होणे बंधनकारक आहे. तसं पाहिलं तर टी 20 सामन्यात दोन्ही डावात पाच ओव्हर्सचा खेळ झालेला असला तरी सामन्याचा निकाल काढता येतो. हा प्लेइंग कंडीशन महत्त्वाचा ठरू शकतो. कारण दोन्ही सामन्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जर या दोन्ही सामन्यात पाऊस पडला तर दोन्ही ग्रुपमध्ये जे संघ आघाडीवर आहेत ते पुढे जातील. जर अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस आहे.