19.7 C
New York

School Bus Accident : जे जे उड्डाणपूलावर शाळेच्या बसला अपघात

Published:

मुंबई

मुंबईतील जे जे उड्डाणपुलावर (JJ Flyover) शाळकरी मुलांना (School Bus Accident) घेऊन जाणार्‍या बसचा अपघात झाल्याचे माहिती समोर आली आहे. या बस मध्ये 20 विद्यार्थी होते. सोशल मीडीयामध्ये सध्या नुकसान झालेल्या गाडीचा फोटो वायरल होत आहे. या अपघातामध्ये बसचा क्लिनर आणि दोन शाळकरी मुलं या अपघातामध्ये जखमी झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी मुलांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी शाळेतून बस जे जे उद्यान पुलावरून जात असताना बाजूच्या भिंतीला बसने धडक दिली. यावेळी बसमध्ये 20 शाळकरी मुले होती. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पायधुनी पोलिसांनी लालू कुमार संतू या बस चालकाला अटक केली. इरफान या 12 वर्षीय जखमी मुलावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच बसमधील मुलांना वाचवण्यासाठी बेस्टचे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मदतीने व्यायाम मधील सर्व 20 मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img