3.7 C
New York

Purva Kaushik : पूर्वा कौशिकने शेअर केला ‘शिवा’ मालिकेतील भन्नाट किस्सा

Published:

‘शिवा’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात घर केले आहे. (Purva Kaushik) ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे. घरा-घरात शिवाची स्टाईल प्रसिद्ध झाली आहे शिवाचा शर्ट-पॅन्ट असो अथवा बॉयकट असो किंवा लग्नानंतरचा साडीचा लुक असो. शिवाची साडी मध्ये फाईट सीनची आता सर्वत्र चर्चा होतं आहे. शिवा म्हणजेच पूर्वा कौशिकने साडी मध्ये फाईट सीन शूट करण्याचा अनुभव व्यक्त केला, “साडी मध्ये फाईट सीन करण्याचा अनुभव खूप कमाल होता.

पूर्वा म्हणून मी आयुष्यात हे करीन असं मला कधीच वाटलं न्हवत मला हे सर्व करायला पण ह्या मालिकेच्या निमित्तामुले मिळालं ह्याबद्दल खरंच आनंद आहे. तसं शर्ट-पॅन्ट मध्ये छोट्या-मोट्या मारामाऱ्या मालिकेत केल्यात, तेव्हा थोडं दडपण आलं होतं जेव्हा साडी मध्ये फाईट सीन करायची चर्चा सुरु झाली कारण ते टीव्ही स्क्रीनवर प्रभावी आणि परिणामकारक दिसलं पाहिजे. माझ्यात ते हावभाव, देहबोली त्या पोशाखानुसार योग्य येईल का ह्याच टेंशन आलं होते. जेव्हा हा सीन करायला केली तो अनुभव अविश्वसनीय होता.

वाढदिवसादिनी सई ताम्हणकरने दिल चाहत्यांना खास गिफ्ट

कुठच्याही कलाकाराच्या आयुष्यात असा क्षण त्याच्या अभिनयाच्या प्रवासात माईलस्टोन असतो आणि मला तो क्षण अनुभवायला मिळाला आहे. फाईट सीनच शूटिंग होतं असताना फाईट मास्टरचे मार्गदर्शन होतेच आणि सर्व गरजेची सावधगिरी घेऊनच आम्ही सगळं शूट करत होतो. मला आधी वाटलं होतं की मी हे साडीत आणि हिल्सच्या सॅण्डलवर हे पेलवू शकीन का, शिवा नव्याने उभी राहायचा प्रयत्न करत आहे तर ती कशी दिसेल आणि ते अगदी जस हवं होतं तसंच झालं. मला तर हार्नेसची खूप गंमत वाटत होती. खरं सांगायच झाले तर जास्त सराव नाही करावा लागला आणि मार्गदर्शन करणारी माणसं ही उत्तम होती. “

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img