एकीकडे भारतीय संघ उपांत्य (IND vs AUS) फेरीत पोहोचल्याचा आनंद साजरा करत आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकचे वक्तव्य व्हायरल झाले आहे. ज्यात त्यांनी ऑस्ट्रेलियावर भारताचा विजय हा फसवणूक करून मिळवल्याचा आरोप केला आहे. इंझमाम-उल-हक यांनी पाकिस्तानच्या स्पोर्ट्स 24 न्यूजशी बोलताना टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाला नियमभंग करून जिंकले असल्याचं म्हटलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने चेंडूशी छेडछाड केल्याचे त्यांचे मत आहे. भारताने बॉल टॅम्परिंग केल्याचे इंझमाम यांचे म्हणणे आहे. त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले माजी क्रिकेटपटू सलीम मलिक देखील इंझमामच्या शब्दांचे समर्थन करताना दिसले.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानवर पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की ओढावली. अमेरिकेने पराभूत केल्यानंतर पुढचं सर्वच चित्र बिघडलं. त्यानंतर भारताने धोबीपछाड दिला आणि पुढच्या सर्वच आशा मावळल्या. दुसरीकडे, भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. भारताच्या कामगिरीमुळे पाकिस्तानची पोटदुखी वाढली आहे. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. त्यात अफगाणिस्तानही उपांत्य फेरीत गेल्याने पाकिस्तानला पोटशूल झाला आहे. अशा सर्व स्थितीत पाकिस्तानच्या आजी माजी क्रिकेटपटूंनी भारतावर नको ते आरोप करण्यास सुरुवात केली आहे.
भारत-इंग्लंड सामन्याचं टायमिंग अजब
IND vs AUS इंझमामचा खळबळजनक आरोप
पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन इंझमाम-उल-हकनं भारताच्या या विजयानंतर खळबळजनक आरोप केलाय. भारताचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) बॉल टेम्परिंग केल्याचा आरोप इंझमामनं केलाय. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ‘हे खूप लवकर होते. तुम्ही 15 व्या ओव्हर टाकत आहात. त्याच ओव्हरमध्ये बॉल रिव्हर्स स्विंग होतोय. आम्हाला रिव्हर्स स्विंग चांगला समजतो. अर्शदीप 15 व्या ओव्हरमध्येच रिव्हर्स स्विंग करत असेल तर बॉलवर काहीतरी सीरियस काम झालं आहे, असा आरोप इंझमामनं केला. पाकिस्तानच्या बॉलरकडून हे झालं असतं तर खूप गोंधळ झाला असता, असा दावाही त्यानं यावेळी केला.
इंझमामने पुढे सांगितलं की, पंचांनी चेंडू तपासायला हवा, टीम इंडियाने चेंडूसोबत काही केलं की नाही? इंझमाम उल हकच्या या आरोपानंतर सलिम मलिक यानेही त्याची री ओढली. सलिम मलिकने सांगितलं की, “चेंडू तपासण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्यासाठी आहेत. भारत आणि आणखी काही संघांना यातून सूट आहे.” त्यानंतर पुन्हा एकदा इंझमामने सांगितलं की, आमच्या संघाच्या खेळाडूंसोबत असं झालं असतं तर त्याचा मुद्दा झाला असता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ पोहोचले आहेत. भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. तर दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे.