मुंबई
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) गुरूवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यानिमित्त पूर्वसंध्येस आज सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्री गण उपस्थित आहेत.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरूवार 27 जूनपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून दोन्ही सभागृहातील सर्व आमदारांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण परंपरेनुसार यंदाही विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून या बहिष्काराचे कारण त्यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवले आहे. पण विरोधकांनी बहिष्काराबाबत सांगितलेल्या कारणांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांकडून खोटे नरेटिव्ह सेट करण्याची फॅक्टरी सुरू करण्यात आली आहे असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण व इतर मागास बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री मंगलप्रभात लोढा , ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन , कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधिमंडळातील सदस्य, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित