23.1 C
New York

Mumbai MLC Election : मुंबईतील मक्तेदारी यंदा संपणार दरेकरांना विश्वास

Published:

मुंबई

मुंबईतील पदवीधरांचा (Mumbai MLC Election) भाजपा, महायुतीवर (MahaYuti) पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे एक संपादक, ज्येष्ठ पत्रकार, वरळी बीडीडी सारख्या सर्वसामान्य वसाहतीत वाढलेला तरुण कार्यकर्ता किरण शेलार हा मुंबईतील (Mumbai) पदवीधरांचे प्रतिनिधीत्व करू पाहतोय. गेली 25 वर्ष ज्यांना आपली मक्तेदारी या मतदार संघात वाटत होती ती यंदा संपणार आहे आणि भाजपा, महायुतीचा झेंडा या मतदारसंघावर फडकणार आहे, असा विश्वास भाजपा विधानपरिषद गटनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केला. तसेच किरण शेलार प्रचंड मताधिक्क्याने मुंबई पदवीधर मतदार (Graduates Constituency Election) संघातून निवडून येतील. तशा प्रकारचे वातावरण पदवीधरांमध्ये दिसत असल्याचेही दरेकर म्हणाले.

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक, नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. आज दहिसर येथील पूर्ण प्रज्ञा स्कुल मतदान केंद्रावर जाऊन आमदार प्रविण दरेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

दरेकर म्हणाले की, शिक्षक मतदारसंघातील चारही उमेदवार पाहिले तर शिक्षकांमधला शिक्षक आणि शिक्षकांसाठी काम करणारा शिवनाथ दराडे हा चांगला कार्यकर्ता, शिक्षक निवडणूक लढवितोय आणि तेही निवडून येतील असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.

दरेकर पुढे म्हणाले की, शिक्षक, बेरोजगार पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न मांडले पाहिजेत आणि ते आम्ही मांडू. सरकार आमचे आहे. सरकारच्या माध्यमातून जेजे पदवीधरांचे विषय आहेत ते सर्व प्रश्न मार्गी लावू. माझे जनतेला, मतदारांना आवाहन आहे की, भाजपा आणि महायुतीच्या पदवीधरांमधून किरण शेलार आणि शिक्षकांमधून शिवनाथ दराडे यांना निवडून द्या. सगळ्या प्रश्नांची जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही सर्व प्रश्न सोडवू, मतदार आम्हाला पाठबळ देतील, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.

उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाबाबत बोलताना दरेकर म्हणाले की, उद्या अधिवेशन आहे. महाराष्ट्रातील जनतेचे अधिवेशनाकडे लक्ष लागले असते. अनेक चांगल्या योजना, लोकोपयोगी गोष्टी अधिवेशनात घेऊ. महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, राज्यातील सामाजिक संतुलन बिघडलेय त्या संदर्भात असेल या सगळ्या गोष्टींवर राज्य सरकार लक्ष केंद्रित करेल महाराष्ट्रात शांतता आणि विकास कसा होईल याचा प्रयत्न करेल, असेही दरेकर म्हणाले.

दरेकर म्हणाले की, अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे. अमोल मिटकरी यांना अधिकार दिलाय का हे प्रदेशाध्यक्षांनी जाहीर करावे जेणेकरून त्यांनी घेतलेली भुमिका अधिकृत आहे असे आम्ही समजू. अमोल मिटकरी यांच्या बोलण्याला महत्व द्यावे असे मला अजिबात वाटत नाही. त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे जेव्हा भुमिका मांडतील त्यावेळी त्या भूमिकेला महत्व येईल. अन्यथा अमोल मिटकरी यांचे बोलणे बोलाची कडी बोलाचा भात असून तिन्ही पक्ष एकत्रितपणे आमचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img