21 C
New York

MahaVikas Aghadi : मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

Published:

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) आणि महायुतीने (Mahyuti) आता विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला दणका दिलाय. त्यामुळे महायुती जेरीस आलेली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून घोळ सुरू आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून एकमत होत नाही. तर महाविकास आघाडीचे दुसरीकडे जागा वाटप जवळ-जवळ निश्चित झाले आहे. कोण मोठा भाऊ, कोण छोटा भाऊ हा मुद्दा आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना बाजूला ठेवला आहे. तिन्ही पक्ष सम-समान जागा लढतील, असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून बिघाडी होऊ नये म्हणून तिन्ही पक्षाचे नेतेही यासाठी राजी झाले आहेत.

इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवालाने हे वृत्त दिले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे तिघे सम-समान जागा लढणार आहेत. म्हणजेच 288 जागांपैकी एका पक्षाला 96 जागा मिळणार आहे. या फॉर्म्युलाबाबत महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्याने माहिती दिली आहे. महाविकास आघाडीचे काही छोटे पक्ष, नेतेही बरोबर आहेत. त्यांना कोणी आणि किती जागा द्यायचे हे निश्चित झाले आहे. ज्या पक्षाबरोबर जो पक्ष किंवा नेता आहे. त्यांनी आपल्या वाट्यातून जागा द्यायची आहे. त्यात काँग्रेस समाजवादी पक्षाला जागा देईल. तर शरद पवार यांची राष्ट्रवादीही शेतकरी आणि कामगार पक्ष यांना जागा देईल. राजू शेट्टी हे बरोबर आल्यास त्यांना राष्ट्रवादी जागा देईल. तसेच डावे पक्ष ही पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आहे.

ड्रग्ज माफियांबाबत राष्ट्रवादीचे केंद्र सरकारकडे ‘ही’ मागणी

MahaVikas Aghadi प्रकाश आंबेडकरांना समावून घेणार ?

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हे लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीबरोबर येणार होते. परंतु पुढे शेवटपर्यंत अंतिम निर्णय झाला नाही. शेवटी वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणूक लढली. काही ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांना वंचितने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीत येऊ शकल्यास त्यांना जागा सोडल्या जातील, असेही मविआच्या नेत्याने स्पष्ट केले आहे. असे असले तरी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असलेले शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत एक बैठक झाली आहे. तर आणखी काही बैठका येत्या काळात होणार आहेत.

MahaVikas Aghadi काँग्रेसची तडजोड

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे तेरा खासदार आहेत. तर अपक्ष विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिलाय, त्यामुळे काँग्रेसचे चौदा खासदार आहेत. खासदार संख्येच्या बळावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अधिक जागा लढण्याचा विचार बोलून दाखविला होता. परंतु आता नाना पटोले ही काही जागांवर तडजोड करण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे जागा वाटप निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

MahaVikas Aghadi महायुती भाजपला हव्यात सर्वाधिक जागा

महायुतीमध्ये भाजपचे सर्वाधिक 105 आमदार आहेत. त्यामुळे ते सर्वाधिक जागा मागत आहेत. भाजपला 150 जागा हव्या आहेत. तर 138 जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिल्या जातील, असे सांगितले जात आहे. परंतु शिवसेनाला 90 ते 100 जागा हव्या आहेत. अजित पवार यांना 90 जागा हव्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये मात्र जागा वाटपावरून तू-तू मैं-मैं होणार हे नक्की दिसत आहे. त्यामुळे महायुतीचे जागा वाटप थेट दिल्ली दरबारी निश्चित होऊ शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img