21 C
New York

Uddhav Thackeray : खोके सरकारचं निरोपाचं अधिवेशन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections) निकालानंतर घोषणा झालेल्या राज्यातील 4 विधानपरिषद निवडणुकांसाठी (Election) आज मतदान पार पडत आहे. याच विधानपरिषदेच्या मतदानासाठी आज ठाकरे कुटुंबीय मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी, उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर भाष्य करताना, त्यांनी खोके सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे. असा हल्लाबोल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्य सरकारवर केला आहे.

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत असून सर्वच मतदारसंघात थेट महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत आहे. मात्र, नाशिक मतदारसंघात अपक्ष आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवारामुळे चौरंगी लढत होत आहे. याच विधानपरिषदेच्या मतदानासाठी आज ठाकरे कुटुंबीय मतदान केंद्रावर आले होते.

मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदान केले. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे, सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे, उद्या मी सर्व विषयावर बोलेन असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान, उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विरोधकांन चहापानांचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सायंकाळी सह्याद्री अतिथी गृहावर विरोधकांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, विरोधकांनी अघोषित परंपरेनुसार चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img