22.3 C
New York

Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितल्या पक्षप्रवेशाच्या अटी

Published:

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात लोकसभा निवडणुकीत मोठा झटका बसला. फक्त एकच जागा निवडून आणता आली. भाजपसोबत गेल्याने काहीच फायदा झाला नाही. अजितदादा मूळ राष्ट्रवादीतून आमदार घेऊन भाजपसोबत गेले खरे पण त्यांना व्होटबँक काही नेता आली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदार अजूनही असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे महायुतीच्या आमदारात चलबिचल सुरू झाली आहे.

अजितदादांसोबत गेलेले काही आमदार पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ज्यांच्या येण्याने पक्षाला फायदा होईल, त्यांचं स्वागतच आहे. पण ज्यांच्या येण्यामुळे पक्षाचं नुकसान होणार आहे त्यांना पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही. दहा वर्षांपूर्वी पक्ष सोडून भाजपात गेलेल्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील काल पुन्हा राष्ट्रवादीत परतल्या. शरद पवार यांनी ही भूमिका यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

लोकसभा अध्यक्षपदासाठी यापूर्वी कधी झाली होती लढत ?

ज्यांनी पक्षाचा फायदा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतला. पक्षाचं नुकसान करून गेलेल्या आमदारांना आता पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही. परंतु, ज्यांच्यामुळे पक्षाचा फायदा होईल अशांना पुन्हा पक्षात घेतलं जाईल. आमदारांच्या या घरवापसीचा निर्णय पक्षातील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून घेतला जाईल यासाठी कार्यकर्त्यांचंही मत विचारात घेतलं जाईल असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्याला महत्व आलं आहे. पक्षात पुन्हा येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटात पक्षाला फायदा देणारे आणि दुसऱ्या गटात पक्षाचं नुकसान करून भाजपात गेलेल्या नेत्यांचा समावेश आहे. या दुसऱ्या गटातील नेते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून स्वतःचा बचाव करण्याच्या उद्देशाने भाजपसोबत गेल्याचं सांगितलं जात आहे. या गटात अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या नेत्यांचा समावेश होतो. आता त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. परंतु, या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच आमदारांना पक्षात घेतलं जाऊ शकतं. शरद पवार यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img